India Vs Pakistan Asia Cup 2023 Super 4  
क्रीडा

IND vs PAK : पावसाचा फायदा टीम इंडियाला?, पाकिस्तानला मिळू शकते मोठे लक्ष्य, जाणून घ्या गणित

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup 2023 Super 4 Colombo : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामना सध्या कोलंबोमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून दिली.

दोघांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. रोहित 56 धावा करून बाद झाला तर गिल 58 धावा करून बाद झाला. यानंतर कोलंबोमध्ये मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला. खेळ थांबला तोपर्यंत भारतीय संघाने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या. केएल राहुल 17 धावांवर तर विराट कोहली 8 धावांवर खेळत आहे.

भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे आज सामना सुरू होऊ शकला नाही, तर सोमवारी त्याच धावसंख्येने सामना सुरू होईल. म्हणजेच विराट कोहली आणि केएल राहुल 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात करतील.

क्रिकइन्फोच्या बातमीनुसार, जर भारतीय संघाने पावसामुळे फलंदाजी केली नाही आणि रविवारी पाकिस्तानला 20 षटकांची फलंदाजी करायची असेल तर सामना जिंकण्यासाठी त्याला 181 धावा कराव्या लागतील. म्हणजेच त्याला प्रत्येक षटकात 9 धावा द्याव्या लागतील. हे त्याच्यासाठी सोपे जाणार नाही.

डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 20 षटकांत 181 धावा, 21 षटकांत 187 धावा, 22 षटकांत 194 धावा, 23 षटकांत 200 धावा आणि 24 षटकांत 206 धावांचे लक्ष्य मिळेल. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.

बांगलादेशचा संघ सुपर-4 च्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात हरला आहे. त्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 11 सप्टेंबरला राखीव दिवशी खेळवला गेला तर त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. 12 सप्टेंबर रोजी भारताला सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेशी सामना करायचा आहे. अशा स्थितीत खेळाडूंना कामाच्या ताणाचा सामना करावा लागू शकतो. विशेषत: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला कारण तो दुखापतीतून परतत आहे. त्याने 14 महिन्यांपासून एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Officer Accident : कोल्हापूरच्या पोलिस अधिकारी वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, कर्नाटकात घटना

Backwater Tourism: पर्यटन प्रेमींसाठी खास! भारतातील या ठिकाणी मिळतो हाऊसबोट स्टेचा आनंद

Premanand Maharaj: देव स्वतः आपल्याला पाप करण्यापासून का रोखत नाही? ; प्रेमानंद महाराजांनी रहस्य उलगडलं

कमळी मालिकेतील अन्नपूर्णा आजीची हटके लव्हस्टोरी, 'बायोलॉजी शिकवत होते पण आयुष्याची केमिस्ट्री जुळली' म्हणाल्या...

IND vs NZ ODI Series : भारतीय संघाला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून रिषभ पंत बाहेर, कारणही आलं समोर...

SCROLL FOR NEXT