India vs Pakistan Asia Cup 2023 esakal
क्रीडा

India vs Pakistan : भारत - पाकिस्तान सामन्यात सूर्या बेंचवर; राहुलने रोहितला टाकलं अडचणीत, चौथ्या क्रमांकावर खेळणार कोण?

अनिरुद्ध संकपाळ

India vs Pakistan Asia Cup : आशिया कपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना, भारत - पाकिस्तान सामना हा 2 सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. वर्ल्डकपपूर्वी भारतासाठी चांगला सराव करून घेण्याची नामी संधी आहे. मात्र भारतीय संघाला अजूनही दुखापतींचा फटका बसत आहे. भारताचा विकेटकिपर केएल राहुल हा दुखापतीतून अजून सावरला नसल्याने तो पाकिस्तानविरूद्धचा सामना खेळणार नाही.

त्यामुळे पाकिस्तानविरूद्ध भारताची प्लेईंग 11 कशी असले याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. केएल राहुलच्या जागी इशान किशनला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळेल हे जवळपास निश्चित आहे. याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे दोघे टीम इंडियात पुनरागमन करतील. मात्र बाबर सेनेविरूद्ध सूर्यकुमार यादव की तिलक वर्मा दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

केएल राहुलने रोहित शर्मासमोर दोन मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिला म्हणजे रोहितला इशान किशनला खेळवावेच लागणार आहे. दुसरे म्हणजे इशान किशन हा फक्त वरच्या फळीतच खेळू शकतो. त्यामुळे भारतीय संघ कोणाला सलामीला पाठवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शुभमन गिल आणि इशान किशन दोघेही सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करतात. मात्र त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन रोहित शर्माला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळवणार का? हा मोठा प्रश्न भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविडसमोर असणार आहे.

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार)

शुभमन गिल

इशान किशन (विकेट किपर)

विराट कोहली

श्रेयस अय्यर

हार्दिक पांड्या

रविंद्र जडेजा

कुलदीप यादव

मोहम्मद सिराज

मोहम्मद शमी

जसप्रीत बुमराह

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Nuchinunde Recipe: इडली-वडा तर नेहमीच खाता; ट्राय करा कर्नाटकचं स्पेशल, प्रोटीनने भरपूर 'नुचिनुंडे'!

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

SCROLL FOR NEXT