India Vs Pakistan Hockey LIVE  esakal
क्रीडा

India Vs Pakistan Hockey : भारताने पाकिस्तानला दिली 4 - 0 ने मात, हरमनप्रीतचे दोन गोल

अनिरुद्ध संकपाळ

Asian Champions Trophy Hockey 2023 India Vs Pakistan : भारताने पाकिस्तानचा 4 - 0 असा सहज पराभव करत एशियन हॉकी चॅम्पियनशिप 2023 च्या लीग स्टेजमधला आपला चौथा विजय मिळवला. भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

भारताने आजच्या सामन्यात 4 पैकी 3 गोल हे पेनाल्टी कॉर्नरवर केले. तर आकाशदीपने 55 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. हरमनप्रीत सिंहने 15 आणि 23 व्या मिनिटाला गोल करत भारताला 2 - 0 अशी आघाडी घेतली होती.

त्यानंतर जुगराज सिंहने 36 व्या मिनिटाला तिसरा गोल करत तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी 3 - 0 अशी नेली. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला बराचकाळ पाकिस्तानचा गोलपोस्ट भेदण्यात यश आले नाही. अखेर 55 व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने मैदानी गोल करत भारताला 4 - 0 असा शानदार विजय मिळवून दिला.

55' - आकाशदीपचा  मैदानी गोल 

36' - जुगराज सिंगचा पेनाल्टी कॉर्नरवर गोल 

हाफ टाईमपर्यंत भारताने पाकिस्तानवर 2 - 0 अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने ही आघाडी 3 - 0 अशी वाढवली. जुगराज सिंहने 36 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नरवर गोल केला.

23' - हरमनप्रीत सिंगचा डबल धमाका 

दुसऱ्या क्वार्टरमध्ये 23 व्या मिनिटाला देखील भारताचा स्टार खेळाडू हरमनप्रीत सिंगने पाकिस्तानवर पेनाल्टी कॉर्नरवरून दुसरा गोल केला. हाफ टाईमपर्यंत भारताने पाकिस्तानवर 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे.

15' - भारताने खाते उघडले

दुसरा क्वार्टर सुरू होताच भारताने गोलचे खाते उघडले. हरमनप्रीत सिंगने पेनाल्टी कॉर्नरवर पहिला गोल करत सामन्यात 1 - 0 अशी आघाडी घेतली.

पहिला क्वार्टर गोल शून्य बरोबरीत 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की दोन्ही संघ जीव तोडून खेळत असतात. याचीच प्रचिती आजच्या हिरो एशियन चॅम्पियन्स हॉकीच्या लीग स्टेजमधील सामन्यात दिसून आली.

पाकिस्तानने पहिल्या क्वार्टरटमधील भारताचे आक्रमण चांगल्या प्रकारे थोपवून धरलं. भारताला 8 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र पाकिस्तानच्या बचाव फळीने मनदीप सिंगला त्यांचा गोलपोस्ट भेदण्याची संधी दिली नाही.

8' - भारताचा चांगला प्रयत्न मात्र.. 

भारताच्या जारमनप्रीत सिंगने मनदीप सिंहला चांगला पास दिला. त्यानंतर मनदीप सिंगने गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र पाकिस्तानी वचाव फळीने त्याला संधी दिली नाही. भारताची चांगली संधी वाया गेली.

पाकिस्तानची चांगली सुरूवात 

सेमी फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या पाकिस्तानने भारताविरूद्ध पहिल्या क्वार्टरच्या सुरूवातीला चांगली सुरूवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT