india vs pakistan davis cup match in islamabad 3 february practice camp in new delhi marathi  sakal
क्रीडा

Davis Cup : इस्लामाबादमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान! कडाक्याच्या थंडीत सराव शिबिर

सकाळ वृत्तसेवा

देशाच्या राजधानीत सध्या कडाक्याची थंडी असली तरी भारतीय डेव्हिस करंडक संघाने पाकिस्तानमध्ये ग्रास कोर्टवर होणाऱ्या लढतीसाठी सराव सुरु केला आहे. ही लढत इस्लामाबादमध्ये तीन आणि चार फेब्रुवारी रोजी होत आहे.

भारताचा सध्याचा सर्वात चांगले रँकिंग असलेला खेळाडू सुमीत नागल (१३७) आणि शशिकुमार मुकुंद (४६३) यांनी माघार घेतली आहे त्यामुळे सध्या भारताकडे रामकुमार रामनाथन हाच एकमेव एकेरीतील खेळाडू आहे, दुसऱ्या खेळाडूचा शोध सुरु आहे. युकी भांब्री किंवा एन. श्रीराम बालाजी यातून एकाची निवड कर्णधार रोहित राजपाल यांना करायची आहे. निकी पूनाछा हा सुद्धा एकेरीसाठी पर्याय आहे.

भांब्री हा खरे तर दुहेरीतील खेळाडू आहे. त्याचे दुहेरीतील एटीपी मानांकन ६१ आहे. दुहेरीतील अनुभवी आणि निष्णांत खेळाडू रोहन बोपण्णा निवृत्त झाल्यामुळे पाकविरुद्ध भांब्री दुहेरीत खेळणार हे निश्चित आहे. भांब्री आणि बालाजी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळत होते पराभवानंतर ते मेलबर्नहून थेट दिल्लीत दाखल झाले, त्यामुळे त्यांनी आज सराव केला नाही. मात्र रामकुमार, पोनाछा आणि साकेत मिर्नेयी यांनी आज अडीच तास सराव केला. या सरावात राष्ट्रीय टेनिस सेंटरमधील उदित कंबोज आणि मान केसर्वानी यांनी त्यांना सहाय्य केले.

भांब्री आणि बालाजी नुतकेच ऑस्ट्रेलियन ओपन खेळून आल्यामुळे त्यांनी आता केवळ हलका वॉर्मअप करावा. ग्रास कोर्टसाठी वेगळ्या प्रकारची चपळता आणि पदलालित्य आवश्यक असते. नेटजवळ जाण्याची चपळाई करावी लागते, असा वॉर्मअप भांब्री आणि बालाजीकडून आम्ही सध्या करुन घेणार आहोत, असे राजपाल यांनी सांगितले. दुहेरीतील दुसरा खेळाडू कोण असेल याचा निर्णय एक दोन दिवसांत घेतला जाईल. पर्याय असलेल्या खेळाडूंचा ग्रास कोर्टवर खेळ कसा होतो हे पाहिल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे सांगून राजपाल पुढे म्हणाले, पाकिस्तानने त्यांच्या घरच्या ग्रास कोर्टवर काही चांगल्या संघांना पराभूत केले आहे त्यामुळे आम्हाला अधिक चांगली तयारी करावी लागेल. ग्रास कोर्टवर नेजवळ कसा खेळ करायचा हे त्यांना माहित आहे त्यामुळे आम्हीही तशीच तयारी करणार आहोत.

ग्रास कोर्टशी मिळते जुळते घेणे सोपे नसते. चेंडू खाली रहातो, परंतु अधिक वेगात येतो त्याचा वेग कधी कधी अनपेक्षित असतो, काही चेंडूंची उसळीही अधिक असते, असे प्रशिक्षक आणि माजी खेळाडू झीशान अली यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT