arshdeep singh sakal
क्रीडा

Arshdeep Singh : पाकविरुद्ध सोडलेल्या झेलमुळे ट्रोल; पंजाबचे सर्व नेते अर्षदीपच्या पाठीशी

पाकिस्तानविरुद्ध निर्णायकक्षणी सोपा झेल सोडणारा वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग सोशल मीडियावर फारच मोठ्या प्रमाणात ट्रोल

सकाळ ऑनलाईन टीम

Arshdeep Singh : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध निर्णायकक्षणी सोपा झेल सोडणारा वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग सोशल मीडियावर फारच मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. राज्यसभेचे खासदार हरभजन सिंग यांच्यासह पंजाबचे अनेक नेते अर्षदीपची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

काल रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी १५ चेंडूंत ३१ धावांची गरज असताना रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर आसिफ अलीचा अतिशय सोपा झेल अर्षदीपने सोडला. आसिफने यावेळी खातेही उघडले नव्हते. त्यानंतर त्याने ८ चेंडूंत १६ धावा फटकावून पाकचा विजय सोपा केला.

या चुकीमुळे अर्षदीपवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आपचे खासदार राघव चढ्ढा, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, पंजाबचे क्रीडामंत्री गुरमीत सिंग आणि भाजपचे नेते मनजिंदर सिरसा हे सर्व २३ वर्षीय अर्षदीपच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अर्षदीपबाबत सुरू असलेला हा अतिशय क्षुद्रपणा आहे, असे मत हरभजन सिंग यांनी व्यक्त केले आहे.

अर्षदीपकडे उत्तम गुणवत्ता आहे. भारतीय वेगवान गोलंदाजीचा तो येत्या काळात हुकमी एक्का असेल. अशा प्रकारचा तिरस्कार त्याचे खच्चीकरण करू शकत नाही, असे चढ्ढा यांनी म्हटले आहे. पंजाबचे क्रीडामंत्री गुरमीत सिंग यांनीही अर्षदीप भारतीय वेगवान गोलंदाजीचे भवितव्य असल्याचा उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Air Force Aircraft Crash : ब्रेकिंग न्यूज! आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचा अपघात

Viral Video: TMC नेता BJP मध्ये सामील व्हायला आला; पण भाजप कार्यकर्ता संतापला, चेहऱ्याला हिरवा रंग फासून बाहेर काढलं

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चोरी; पुण्यातील महिलेचे २० लाखांचे दागिने अन् रोकड लंपास

'लग्न पंचमी नाटकातून अमृता खानविलकरची एक्झिट; ही गोष्ट ठरली कारण; आता स्वप्नीलसोबत दिसणार 'जीव झाला वेडापिसा' फेम अभिनेत्री

SCROLL FOR NEXT