IND vs PAK India Playing 11 Esakal
क्रीडा

IND vs PAK India Playing 11 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 17 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला रोहित पुन्हा डावलणार?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK India Playing 11 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची उद्या (दि. 14 ऑक्टोबर) वर्ल्डकप 2023 मधील सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. कारण रोहित सेनेला बाबर सेनेसोबत दोन हात करायचे आहेत. भारत आणि पाकिस्तान यांनी आपले दोन्ही सामने जिंकून दमदार सुरूवात केली असून उद्याच्या सामन्यात एका संघाला पहिल्या पराभवाची चव चाखायची आहे.

दरम्यान, रोहित शर्माला उद्याच्या सामन्यात भारताची प्लेईंग 11 निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे. रोहितसमोर मोहम्मद शमी की शार्दुल ठाकूरला संघात स्थान द्यायचं हा मोठा प्रश्न असेल. तर आजारपणातून सावरत असलेल्या शुभमन गिलने नेटमध्ये सराव केला आहे. तो पूर्णपणे फिट झाला आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे इशान किशनच्या संघांतील स्थानाबाबत देखील अनिश्चितता आहे.

मात्र अजून आजारपणातून सावरत असलेल्या गिलला लगेच संधी द्यायची की इशान किशनलाच पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळवायचं हा प्रश्न रोहित शर्मासमोर नक्की असणार आहे.

दुसरीकडे रोहितने अफगाणिस्ताविरूद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या ऐवजी शार्दुल ठाकूरची निवड केली होती. त्यामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या होत्या. मोहम्मद शमी हा गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियम हे त्याचे आयपीएलमधील होम ग्राऊंड आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये एकूण 28 विकेट्स घेतल्या होत्या. त्यातील 17 विकेट्स त्याने नरेंद्र मोदी स्टेडियमवर घेतल्या आहेत.

भारताची पाकिस्तानविरूद्धची संभाव्य प्लेईंग 11

  1. रोहित शर्मा

  2. इशान किशन

  3. विराट कोहली

  4. श्रेयस अय्यर

  5. केएल राहुल

  6. हार्दिक पांड्या

  7. रविंद्र जडेजा

  8. शार्दुल ठाकूर / मोहम्मद शमी

  9. कुलदीप यादव

  10. जसप्रीत बुमराह

  11. मोहम्मद सिराज

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT