India Vs Pakistan SAFF Championships
India Vs Pakistan SAFF Championships esakal
क्रीडा

India Vs Pakistan Football : पाकिस्तानचा गोंधळात गोंधळ; संघ दोन विमानातून दाखल झाला भारतात

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan SAFF Championships : एसएएफएफ चॅम्पियनशिपच्या पहिल्याच सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडणार आहेत. बंगळुरू येथे आज 7.30 वाजता हा सामना होणार आहे. मात्र या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ दाखल होताना काही समस्या निर्माण झाली होती.

पाकिस्तान फुटबॉल संघातील 6 खेळाडू आणि 3 अधिकारी हे आज सकाळी 6 वाजता बंगळुरू विमानतळावर दाखल झाले. तर उरलेला संघ हा दुपारी 12.30 ला बंगळुरू येथे दाखल झाला. पाकिस्तानचा संघ दोन विमानातून भारतात आले.

काही खेळाडूंना उशीर होणार असल्याने सामन्याची वेळ बदलण्यात येणार का अशी चर्चा सुरू होती. मात्र सामना ठरल्या वेळेनुसारच होणार आहे.

पाकिस्तान संघाला भारतात दाखल होण्यासाठी लागणारा विजा अजून मिळाला नसल्याने सर्व गोंधळ झाला. यामुळे पाकिस्तान संघाला दोन दिवस उशिरा विजा मिळाला. संघ मॉरिशियसमध्ये पोहचला होता. ते भारतात मुंबई विमानतळावर येणार होते. तेथून ते बंगळुरू येथे पोहचणार होते.

पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला पाकिस्तानच्या मंत्रालयाकडून उशिरा ना हरकत प्रमाणपत्र मिळाले. ही परवानगी शुक्रवारी मिळाली यानंतर संघ रविवारी पुढच्या प्रवासाला निघाली. मात्र संघाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळणार नव्हता म्हणून सामना पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती संघाने केली होती.

मात्र जर पाकिस्तान संघ आज रात्री बंगळुरात दाखल झाला नाही तर सामना पुढे ढकलला जाणार होता. मात्र संघ दाखल झाल्याने सामना ठरल्या वेळेनुसार होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ देखील स्टेडियममध्ये दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas War: ''मोदींच 'हे' करु शकतात, कारण ते ग्लोबल लिडर आहेत'', पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचं पत्र

T20 WC 24 Super 8 : सुपर-8ची शर्यत रोमांच मोडवर! 20 पैकी 11 संघांचा पत्ता कट; आता एका जागेसाठी दोन टीममध्ये टक्कर

Ganga Dussehra 2024: गंगा दशहराला काय करावे अन् काय नाही? वाचा एका क्लिकवर

Ravindra Waikar : ज्या मोबाईलवरुन EVM अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला दिला; धक्कादायक प्रकार उघड

Latest Marathi News Live Update : तुर्भे एमआयडीसी परिसरात पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT