India Vs Pakistan T20 World Cup 2022 Rishabh Pant Recall How He Hit Two Sixes To Hassan Ali  esakal
क्रीडा

IND vs PAK : सामन्यापूर्वीच पंतने पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीला जागा दाखवून दिली

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्डकपमध्ये येत्या 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज लढत होणार आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ वर्ल्डकपची मोहिम याच सामन्याने सुरू करणार आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या सामन्यात जवळपास एक लाख प्रेक्षक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, सुपर 12 च्या यासामन्यापूर्वी भारताचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीबाबतचा एक किस्सा सांगितला.

रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आपली वर्ल्डकपची सुरूवात ही विजयाने करण्यास उत्सुक असणार आहे. 2021 मध्ये युएईत झालेल्या गेल्या टी 20 वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सनी पराभूत केले होते. याबबत पंत म्हणाला, 'पाकिस्तानविरूद्ध खेळणे कायम खास असते. या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये एक वेगळा उत्साह असतो. या सामन्यात फक्त आमच्याच नाही तर चाहत्यांसह अनेकांच्या भावना गुंतलेल्या असतात.'

ऋषभ पंत पुढे म्हणाला, 'हा एक वेगळ्या प्रकारची अनुभव असते. एक वेगळेच वातावरण असते. ज्यावेळी तुम्ही मैदानावर जाता त्यावेळी सगळ्या दिशेने लोक तुम्हाला चिअर करतानाचा आवाज येत असतो. हा एक वेगळाच अनुभव असतो. ज्यावेळी आपण आपले राष्ट्रगीत गात असतो त्यावेळी तर हा सळसळता उत्साह टिपेला पोहचलेला असतो.'

गेल्या वर्षी दुबईत खेळल्या गेलेल्या टी 20 वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान सामन्यातील एका प्रसंगाची पंतने आठवण सांगितली. पंत म्हणाला की, 'मला आठवते की मी त्या सामन्यात हसलन अलीला एकाच षटकात दोन षटकार मारले होते. आम्हाला धावगती वाढवण्याची गरज होती कारण आम्ही स्वस्तात आमच्या विकेट गमावल्या होत्या. मी आणि विराट कोहलीने भागीदारी रचली होती. आम्ही धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी मी एका हाताने दोन षटकार मारले होते.' ऋषभ पंतला मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT