क्रीडा

India vs Pakistan : बीडच्या 'सचिन'समोर पाकिस्तान आला रडकुंडी! ठोकले खणखणीत अर्धशतक

भारताने पाकिस्तानला दिले 260 धावांचे लक्ष्य...!

Kiran Mahanavar

India vs Pakistan U19 Asia Cup 2023 : अंडर-19 आशिया कप स्पर्धेत भारताचा दुसरा सामना पाकिस्तानशी दुबईत रंगला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने नऊ गडी गमावून 259 धावा केल्या. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. यामध्ये एक महाराष्ट्रातील बीड जिल्हातील सचिन दासने आक्रमक अर्धशतक ठोकले.

यासोबत भारतीय कर्णधार उदय सहारन आणि सलामीवीर आदर्श सिंग यांनी शानदार अर्धशतके झळकावली आहेत. उदय सहारनने 98 चेंडूत 60 धावांची खेळी केली आहे, तो नक्कीच संथ गतीने खेळला, पण दबावाखाली ही खेळी खूपच अप्रतिम होती. याशिवाय आदर्श सिंहने 81 चेंडूत 62 धावांची खेळीही खेळली आहे. आदर्शनेही आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला.

पण सचिन दासने शेवटच्या काही षटकात आक्रमक फंलदाजी केल्यामुळे संघाची धावसंख्या 259 पर्यंत पोहोचू शकली. त्याने यासामन्यात 58 धावांची खेळी खेळली, यादरम्यान सचिनने तीन षटकार आणि दोन चौकार मारले.

पाकिस्तानकडून अमीर हसन, उबेद शाहने 2-2 तर मोहम्मद जीशानने 4 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय अराफत मिन्हासनेही एक विकेट आपल्या नावावर केली आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे भारत 259 धावांवर रोखता आले.

पहिला आणि दुसरा विकेट पडल्यानंतर आदर्श सिंगने ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू केली, त्यावरून संघाची धावसंख्या 300 च्या पुढे जाईल असे वाटत होते, पण त्यानंतर एकापाठोपाठ विकेट पडत राहिल्या आणि भारतीय संघ अवघ्या 259 धावांपर्यंत पोहोचला. पाकिस्तानसाठी हे लक्ष्य सोपे नसेल, कारण भारताकडेही अनेक घातक गोलंदाज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT