India vs Pakistan Women World Cup  ESAKAL
क्रीडा

INDW vs PAKW : स्नेह - पूजा जोडीने पाकला झोडपले; सोपा सामना झाला अवघड

अनिरुद्ध संकपाळ

माऊंट माऊनगानुई : आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 मधील (ICC Women World Cup 2022) हाय व्होल्टेज भारत पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती-दिप्तीने चांगली सुरूवात करून दिल्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळही होती. मात्र पूजा वस्त्रकार (67) आणि स्नेह राणा (57) यांनी धडाकेबाज फलंदाजी करत भारताला 50 षटकात 7 बाद 244 धावांपर्यंत पोहचवले.

भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर दिप्ती शर्माबरोबर (Dipti Sharma) भागीदारी रचत टीम इंडियाला शतकाजवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दिप्ती शर्मा 40 धावांवर बाद झाली आणि ही जोडी फुटली.

दिप्ती पाठोपाठ 52 धावांची आर्धशतकी खेळी करणाऱ्या स्मृती मानधनला आनम अमिनने बाद करत भारताला दुसरा मोठा धक्का दिला. यानंतर भारताची गळती सुरू झाली. स्मृती आणि दिप्तीची दुसऱ्या विकेटसाठी केलेली 92 धावांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर भारताची अवस्था 1 बाद 96 वरून 6 बाद 114 अशी झाली. स्मृती बाद झाल्यानंतर कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्यावर भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी आली होती.

मात्र या दोघींनीही निराशा केली. निदा दारने कौरला अवघ्या 5 धावांवर बाद केले. तर मिताली राज 9 धावा करून नाशरा संधूची शिकार झाली. रिचा घोष देखील अवघ्या 1 धावेची भर घालून माघारी परतली. भारताच्या मधल्या फळीने निराशा केल्यामुळे आता सन्मानजनक धावा उभारण्याचा भार तळातील फलंदाजांच्या खांद्यावर आला आहे. पाकिस्तानकडून निदा दार आणि नाशरा संधू यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत.

मोठे स्टार माघारी परतल्यानंतर आपला वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळणाऱ्या पूजा वस्त्रकार (Pooja Vastrakar) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांनी भारताला तारले. या दोघींनी भारताची मधली फळी माघारी गेली असताना देखील आक्रमक फलंदाजी करत भारताला 50 षटकात 244 धावांपर्यंत पोहचवले. पूजा वस्त्रकारने ( 59 चेंडूत 67 धावा चोपल्या तर स्नेह राणाने 48 चेंडूत 53 धावांची खेळी करत पूजाला चांगली साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT