India Vs Pakistan Rain esakal
क्रीडा

India Vs pakistan:भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टेबाजांची नजर, आतापर्यंत लागलाय इतक्या कोटींचा सट्टा

Betting on World Cup Match: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आहे. हा आकडा ४ कोटींपेक्षा जास्त आहे.

Manoj Bhalerao

Betting on India vs Pakistan Match:एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यासाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. भारत आणि पाकिस्तान सामन्याची ज्या दिवळी तारीख जाहीर करण्यात आली होती, त्याच दिवशी सर्व तिकीटांची विक्री देखील झाली.

भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाही, त्यामुळे हे संघ आयसीसी स्पर्धांमध्येच समोरासमोर असतात. त्यामुळे सर्व देशांच्या नजरा या सामन्यावर खिळून असतात. मात्र, या सामन्याची जितक्या आतुरतेने चाहते वाट बघतात तितक्याच आतुरतेने सट्टेबाजांची देखील नजर यावर असते.

भारत आणि पाकिस्तान हे संघ शनिवारी (दि. १४ ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सामन्यावर सट्टेबाजारात जवळपास ४० कोटींचा सट्टा लागलाय. मात्र, हा आकडा याहूनही मोठा असल्याचा अंदाज आहे. याबाबत टीव्ही-९ मराठीने वृत्त प्रसारित केले आहे.

भारत आणि पाकिस्तान या संघात भारतातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर सामना खेळवला जातोय. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफीक याला २० धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर असताना पायचित करुन पाकिस्तानला पहिला धक्का दिला. त्यानंतर हार्दिक पंड्याने इमाम-उल-हल याला केएल राहुलच्या हातून झेलबाद केले. अशा पद्धतीने पाकिस्तनची सलामीवीर जोडी तंबूत परतली. (Latest Marathi News)

एकदिवसीय विश्वचषकात भारताचं पाकिस्तानवर दांडगं वर्चस्व आहे. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान विश्वचषकात एकूण ७वेळा समोरासमोर आले आहेत. यामधील सर्व सामने भारताने जिंकले आले आहेत. विश्वचषकात पाकिस्तान भारताला एकदाही पराभूत करु शकत नाही. पाकिस्तानला अजूनही पहिल्या विजयाची आस आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT