cricket worldcup special express sakal
क्रीडा

World Cup 2023 : मुंबईतील क्रिकेट प्रेमींचा विक्रम! 'क्रिकेट विश्वचषक विशेष एक्सप्रेस' १७ मिनिटात हाऊसफुल्ल

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

India Vs Pakistan World Cup 2023 : मुंबई - क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी अहमदाबाद जाणाऱ्या क्रिकेट प्रेमींची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष गाडी चालविण्याची घोषणा केली आहे.

मात्र, गुरुवारी पहिल्या क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेनची सर्व तिकिटे अवघ्या १७ मिनिटांत आरक्षित झाली आहे. त्यामुळे मुंबईतील क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेनची घोषणा पश्चिम रेल्वेने केली आहे.

पहिल्या विश्वचषक स्पेशल ट्रेनची तिकिट आरक्षण गुरुवारी सकाळी सुरु झाले होते. मात्र, अवघ्या १७ मिनिटांत ट्रेन क्रमांक ०९०१३ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल ट्रेनचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले होते. प्रतीक्षा यादीही २०० पुढे गेली होती. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

पहिल्या विश्वचषक स्पेशल ट्रेनला प्रवाशांच्या तुफान प्रतिसाद बघता पश्चिम रेल्वेने १३ सप्टेबर २०२३ रोजी आणखी एका दुसऱ्या विश्वचषक स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या विश्वचषक स्पेशल ट्रेनची क्षमता १५३१ आसनांची आहे, जी आधी जाहीर केलेल्या पहिल्या विश्वचषक स्पेशल ट्रेनच्या तुलनेत २९९ जागांची लक्षणीय वाढ आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, क्रिकेट प्रेमींची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दुसरी विश्वचषक स्पेशल ट्रेन क्रमांक ०९०१५ शुक्रवार, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११.२० वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता अहमदाबादला पोहोचेल.

परतीच्या दिशेने, ट्रेन क्रमांक ०९०१६ अहमदाबादहून रविवार, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी मध्य रात्री २ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १०. ३० वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. दुसरी विश्वचषक स्पेशल ट्रेन दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन स्थानकावर दोन्ही दिशांना थांबेल, ज्यामुळे अनेक ठिकाणांहून चाहत्यांना सोयीस्कर प्रवेश मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT