India vs South Africa 1st ODI Arshdeep Singh 
क्रीडा

Sa Vs Ind : अर्शदीप सिंगचा पंजा, आवेश खानचा चौकार! दक्षिण आफ्रिकेचा 116 धावांवर खेळ खल्लास

Kiran Mahanavar

India vs South Africa 1st ODI Arshdeep Singh News : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम करण्याचा निर्णय घेतला. मात्र नाणेफेक जिंकण्याव्यतिरिक्त त्यांच्यासाठी दुसरं काही चांगलं झालं नाही. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्या धारदार गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला 116 धावांत ढेर केलं. आणि भारताला केवळ 117 धावांचे आव्हान दिलं.

सुमारे वर्षभरानंतर वनडे संघात पुनरागमन करणाऱ्या डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या कारकिर्दीतील हा केवळ चौथा एकदिवसीय सामना होता. पण त्याने या सामन्यात सुरुवात चांगल केली. त्याने दुसऱ्याच षटकात रीजा हेंड्रिक्स आणि रासी ड्युसेनला शुन्यावर बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले.

यानंतर टोनी दे झोरझीने आक्रमक फलंदाजी करत धावा करण्याचा प्रयत्न केला मात्र टोनी आणि एडिन माक्ररमची जोडी अर्शदीपनेच फोडली. दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज गारद करणाऱ्या अर्शदीपने आपली चौथी आणि मोठी शिकार केली. त्याने क्लासेनला 6 धावांवर बाद केलं. आफ्रिकेची अवस्था 4 बाद 52 धावा अशी केली.

अर्शदीपच्या कहरानंतर आवेश खानची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. आफ्रिकेच्या डावातील 11व्या षटकात आवेश खानची हॅटट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि व्हियान मुल्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर आवेशने डेव्हिड मिलरला यष्टिरक्षक राहुलकडे झेलबाद केले. मिलरला 2 धावा करता आल्या. यानंतर त्याने केशव महाराज (25) याला चौथा बळी टिपला.

त्यानंतर 26 व्या षटकात अँडिले फेहलुकवायोला बाद करून अर्शदीपने कारकिर्दीत प्रथमच एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात ५ बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. फेहलुकवायोलाने 49 चेंडूत 33 धावा करून तो बाद झाला. तर, कुलदीपने शेवटची विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT