SA vs Ind 1st ODI Playing 11  
क्रीडा

SA vs Ind 1st ODI Playing 11 : एकदिवसीय क्रिकेटचे नवे पर्व आजपासून! संघात होणार अनेक बदल, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?

Kiran Mahanavar

SA vs Ind 1st ODI Playing 11 News : भारताच्या एकदिवसीय क्रिकेटमधील नव्या पर्वाला आजपासून (ता. १७) सुरुवात होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्‍विन या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नव्या दमाच्या युवा खेळाडूंसह टीम इंडियाचा संघ दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे.

के. एल. राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ आगामी चॅम्पियन्स करंडक (२०२५) व एकदिवसीय विश्‍वकरंडक (२०२७) या दोन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी तयारीला लागणार आहे.

के. एल. राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व असेल. याचसोबत त्याच्यावर फलंदाजी तसेच यष्टिरक्षणाचीही जबाबदारी असणार आहे. ॠतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पटीदार, रिंकू सिंग यांच्या खांद्यावर फलंदाजीची मदार अवलंबून असेल. दरम्यान, राहुल याने कसोटीतही यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळण्याची तयारी असल्याचे या वेळी सांगितले. तसेच रिंकू सिंग पहिल्या सामन्यात खेळणार असल्याचे संकेत दिले.

श्रेयस अय्यर फक्त पहिल्या सामन्यात खेळणार

श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताचे प्रतिनिधीत्व करील; मात्र त्यानंतरच्या दोन लढतींमध्ये तो खेळणार नाही. पहिल्या एकदिवसीय लढतीनंतर तो कसोटी संघाशी जोडला जाईल. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

फिरकी अन्‌ वेगवान गोलंदाजांची चौकडी

भारतीय संघात चार वेगवान आणि चार फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव व युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. कुलदीप यादवला अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल यात शंका नाही. तसेच मुकेशकुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग व आकाशदीप या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या लढतीत मुकेशकुमार, अर्शदीप सिंग या दोघांचे संघातील स्थान कायम असण्याची शक्यता आहे.

दीपकऐवजी आकाशचा समावेश

वेगवान गोलंदाज दीपक चहर याने एकदिवसीय मालिकेमधून माघार घेतली आहे. कौटुंबिक कारणामुळे त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. निवड समितीकडून दीपक चहरऐवजी आकाश दीप याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

मोहम्मद शमीची कसोटी मालिकेमधून माघार

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा अद्याप दुखापतीमधून पूर्णपणे बरा झालेला नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला खेळता येणार नाही. वैद्यकीय समितीकडून त्याला खेळण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही, अशी माहिती ‘बीसीसीआय’कडून शनिवारी देण्यात आली.

पहिली एकदिवसीय लढत

  • भारत x दक्षिण आफ्रिका

  • स्थळ ः जोहान्सबर्ग

  • वेळ ः दुपारी १.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT