South Africa vs India Live Telecast news marathi 
क्रीडा

SA vs IND : जिओ सिनेमावर नव्हे, तर 'या' ठिकाणी पाहता येणार आफ्रिकेविरुद्धचे टी-20 सामने; जाणून घ्या सर्व काही

Kiran Mahanavar

South Africa vs India Live Telecast : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून म्हणजेच 10 डिसेंबरला डर्बन येथे सुरुवात होणार आहे.

पहिला टी-20 सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. तर दोन्ही कर्णधार सूर्यकुमार यादव आणि एडन मार्कराम नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी मैदानात येतील. या मालिकेच्या सामन्याच्या टीव्ही टेलिकास्ट आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म देखील बदलले आहेत.

भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची शेवटची टी-20 मालिका स्पोर्ट्स 18 वर थेट प्रक्षेपित करण्यात आली होती. तर चाहत्यांनी Jio सिनेमावर या सामन्यांचा ऑनलाइन आनंद लुटला होता, पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी प्लॅटफॉर्म बदलला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिकेशी संबंधित काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया....

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना कधी, कुठे, किती वाजता सुरू होणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना आज म्हणजेच 10 डिसेंबर रोजी किंग्समीड, डर्बन येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल, दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी मैदानात उतरतील.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना टीव्हीवर कसा पाहायचा?

तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्कवर टीव्हीवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना पाहू शकता. तर फ्री मध्ये टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील DD Sports वर होईल.

ऑनलाईन लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहू शकता?

डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर तुम्ही भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-20 सामन्याचा ऑनलाइन आनंद घेऊ शकता. सकाळच्या स्पोर्ट्स पेजवरही तुम्ही या सामन्याशी संबंधित प्रत्येक बातम्या वाचू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT