india vs south africa 2nd t20 weather forecast 
क्रीडा

IND vs SA : दुसऱ्या टी-२० वर पावसाचे सावट; सामन्यासाठी खास अमेरिकेहून मागवले पिच कव्हर्स

सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याने टीम इंडियाच्या या आशा गुवाहाटीमध्ये धुळीला मिळू शकतात

Kiran Mahanavar

India vs South Africa 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज गुवाहाटी येथे खेळल्या जाणार आहे. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकूण मालिका आपल्या नावावर करण्यावर त्याची नजर असेल. सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याने अमेरिकेहून पिच कव्हर्स मागवले आहे.

सामन्यापूर्वी आकाशातील ढगांमुळे आयोजकांची चिंता वाढली आहे. यापूर्वी 5 जानेवारी 2020 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे झाला नव्हता. प्रादेशिक हवामान केंद्राने रविवारी गुवाहाटीमध्ये अंशतः ढगाळ आकाश आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान पाऊस पडल्यास वेळेत होणारे नुकसान कमी करण्यासाठी सर्व व्यवस्था केल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

गुवाहाटीच्या मैदानावर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध टी-20 सामने खेळणार आहेत. टीम इंडियाची नजर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच आपल्या भूमीवर टी-20 मालिका जिंकणार असले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही आठवी द्विपक्षीय टी-20 मालिका आहे. यामध्ये भारताने तीन वेळा तर दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा मालिका जिंकली आहे. दोन मालिका अनिर्णित राहिल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर तीन वेळा पराभूत केले आहे, मात्र घरच्या मैदानावर कधीही विजय मिळवता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने 2015-16 मध्ये भारतात तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली होती.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत,दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल/रविचंद्रन अश्विन.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), रिले रॉसो/रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, बेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरीझ शम्सी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

FIFA World Cup 2026: अमेरिकेची विश्वकरंडकात धडाकेबाज एंट्री! ऑस्ट्रेलियाचा पराभव करून थेट बाद फेरीत

Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!

SCROLL FOR NEXT