India Vs South Africa 2nd T20I at Guwahati Weather forecast  esakal
क्रीडा

IND vs SA 2nd T20 : गुवाहाटीत होणाऱ्या दुसऱ्या टी 20 सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी

अनिरुद्ध संकपाळ

India Vs South Africa 2nd T20I : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला टी 20 सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता गुवाहाटीत होणाऱ्या दुसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यात भारतीय संघ असेल. मात्र या सामन्यात पाऊस देखील हजेरी लावू शकतो. त्यामुळे कोरोना महामारी सुरू झाल्यापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना न झालेल्या गुवाहाटीत क्रिकेट चाहत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. गुवाहाटीच्या स्टेडियमवर झालेला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना देखील पावसामुळे रद्द करावा लागला होता. (Guwahati Weather forecast Rain)

गुवाहाटीतील स्थानिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी ढगाळ वातावरण असणार आहे. याचबोरबर पावसाच्या मोठ्या दोन सरी किंवा थंडरशॉवर देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयोजकांनी सांगितले की त्यांनी जर पाऊस झाला तर त्यानंतर मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी सर्व तरतूद करून ठेवण्यात आली आहे.

आसाम क्रिकेट असोसिएशनने दोन अत्यंत हलके दोन पिच कव्हर्स अमेरिकेतून आयात केले आहेत. मैदानात आधीपासूनच 20 कव्हर्स उपलब्ध आहेत. आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवाजीत सिक्का यांना सांगितले की, 'हे आयात केलेले कव्हर्स पिचवर पाणी किंवा दव पडू देत नाहीत.'

गुवाहाटी स्टेडियममध्ये 39 हजार प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता आहे. सामन्यादिवशी दुर्गा पूजा आणि गांधी जयंती आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमकडे येण्याची शक्याता आहे. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील उपाययोजना तयार करून ठेवल्या आहेत. आज सकाळी क्रिकेटर अक्षर पटेल आणि उमेश यादव यांनी प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांना या शक्तीपीठापर्यंत घेऊन जाण्यासाठी मोठा फौजफाटा देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीचा जबरदस्त विक्रम अन् टोलेजंग फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय..

Latest Marathi News Live Update : गडचिरोली पोटनिवडणुकीत भाजपचे अंकुश नैताम विजयी; काँग्रेसला धक्का

SCROLL FOR NEXT