IND VS SA 
क्रीडा

IND VS SA : अरे चालले तरी काय! आधी सापामूळ आता खराब प्रकाशामुळे थांबला सामना

आधी पाऊस नाही मात्र सापानं सामना थांबवला आता...

Kiran Mahanavar

India vs South Africa 2nd T20I Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे खे ळल्या जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आहे. भारताच्या 237 धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने 2.1 षटकांत 2 गडी गमावून पाच धावा केल्या. क्विंटन डी कॉक पाच आणि एडन मार्कराम शून्यावर खेळत आहे. यापूर्वी मैदानात साप दिसल्याने सामना थांबवण्यात आला होता, मात्र काही वेळातच सामना सुरू झाला. यावेळी मैदानावरील एकही फ्लड लाईट काम करत नव्हती. यामुळे सामना थांबवण्यात आला आणि काही वेळाने लाईट फिक्स झाल्यानंतर सामना सुरू झाला.

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पॉवर प्लेची आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांना भारताला पहिल्या 3 षटकात 21 धावांपर्यंतच मजल मारून देता आली. पहिल्या तीन षटकात फारसे हात खोलण्याची संधी न मिळालेल्या रोहित - राहुल जोडीने पुढच्या तीन षटकात तुफान फटकेबाजी करत भारताला 6 षटकात बिनबाद 57 धावांपर्यंत पोहचवले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीरांना पॉवर प्लेमध्येच आक्रमक सुरूवात केली. मात्र सातव्या षटकानंतर खेळ काही खाळ थांबवावा लागला कारण मैदानात साप आला होता.

विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. मात्र गैरसमजामुळे सूर्यकुमार 22 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. विराट 28 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. अखेरीस, दिनेश कार्तिकने सात चेंडूत 17 धावा करत भारताची धावसंख्या 237 धावांवर नेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir Post For Ajit Agarkar: प्रिय अजित भाई...! गौतम गंभीरची पोस्ट; अजित आगरकरचे कौतुक करताना साधला निशाणा

RBI Governor Inflation: साखर-कांद्याने वाढवली महागाईची चिंता! दिवाळीत महागाई वाढणार? RBIचा मोठा इशारा

कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा यांनी पुन्हा एकदा दिली गुड न्यूज; मुलगी सामायराही सोबत; फोटो व्हायरल

Navratra 2026: नवरात्री दरम्यान दुर्गा पूजेसाठी कडक नियमावली; मंडप आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेवर पूर्ण बंदी!

Latur Professor Murder : अनैतिक संबंधातून कोल्हापूरच्या प्राध्यापकाची हत्या; लातूरमधून अपहरण करुन बीडमधील खडी क्रशरवर नेले अन्... चौघांना अटक

SCROLL FOR NEXT