india vs south africa aiden markram test covid positive 
क्रीडा

IND vs SA: टी-20 मालिकेत कोरोनाची एन्ट्री; एडन मार्कराम पॉझिटिव्ह

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एडन मार्कराम कोविड पॉझिटिव्ह

Kiran Mahanavar

India Vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कोरोनाने प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एडन मार्कराम कोविड पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यापूर्वी टॉप-ऑर्डरचा फलंदाज एडन मार्करामची कोविड-19 पॉझिटिव्ह आली. नाणेफेकदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने यांची माहिती दिली. तो पुढे म्हणाला की ट्रिस्टन स्टब्सने मार्करामची जागा खेळणार आहे.(Ind Vs Sa Aiden Markram Test Covid Positive)

नाणेफेक दरम्यान बावुमा म्हणाला – एडन निवडीसाठी उपलब्ध नाही, कारण त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या जागी ट्रिस्टियन स्टब्सचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याला चांगली सुरुवात करण्याची चांगली संधी आहे. ही एक महत्त्वाची मालिका आहे कारण आम्ही ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकाची तयारी करत आहे.

बीसीसीआयने खेळाडूंना या मालिकेपूर्वी मोठा दिलासा दिला होता. बोर्डाने होम सीरिजमधून बायो-बबलचा नियम रद्द केला होता. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना कठीण क्वारंटाईनचा सामना करावा लागला नाही. मार्करामने भारतात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या इतर खेळाडूंचीही भेट घेतली असेल. अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडूंवर कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे, परंतु पहिला सामना सुरूच ठेवण्यात आला आहे. मात्र, आता कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर ही मालिका धोक्यात आली आहे.

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या मधल्या फळीत मार्करामने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने शानदार फलंदाजी केली आणि 14 सामन्यात तीन अर्धशतकांच्या मदतीने 381 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ 9 जून ते 19 जून या कालावधीत पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसरा सामना कटकमध्ये, तिसरा विशाखापट्टणममध्ये, चौथा राजकोटमध्ये आणि पाचवा सामना बेंगळुरूमध्ये होईल. दक्षिण आफ्रिका संघ 2019 नंतर प्रथमच भारतात T20 मालिका खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

Video: रावणाची दहा डोकी घेऊन फिरत होती राखी सावंत, अशाच अवतारात छम्मक छल्लो गाण्यावर नाच नाच नाचली, व्हिडिओ बघून तुम्ही पण हसाल

Mysore Dasara History : 100 वर्षांपूर्वी म्हैसूरच्या राजवाड्यात कसा साजरा व्हायचा शाही दसरा? हैदर अली, टिपू सुलतानचा उदय झाला अन्...

SCROLL FOR NEXT