Team India esakal
क्रीडा

IND vs SA T20: चौथ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे वाढले टेन्शन, पण...

धनश्री ओतारी

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी-२० सामना खेळण्यासाठी राजकोटमध्ये दाखल झाला आहे. आज हा सामना खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. विकेटकिपर बॅट्समन क्विटंन डिकॉकने आपल्या संघाला म्हणजेच दक्षिण आफ्रिकेला खुशखबर दिली आहे.

सीरीजमधील दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी डी कॉकला मनगटाची दुखापत झाली होती. यामुळे तो दुसरा आणि तिसरा सामना खेळू शकला नाही. तर पहिल्या सामन्यात डी कॉकने 22 धावांची खेळी केली होती. डेकॉक चौथा सामना खेळला तर टीम इंडियासाठी ही चिंतानजक बाब आहे. कारण डि कॉक आयपीएलपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतचं, दक्षिण आफ्रिका व्यवस्थापनाने डी कॉकच्या दुखापतीबाबत अपडेट दिले. 'क्विंटन डी कॉकच्या मनगटाच्या दुखापतीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. चौथ्या सामन्यासाठी डेकॉकच्या उपलब्धतेबाबत निर्णय शेवटच्या क्षणीच घेतला जाऊ शकतो.' असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाच सामन्यांच्या T20I सीरीजमध्ये दक्षिण आफ्रिका सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. पाहुण्या संघाने दिल्ली आणि कटक येथे झालेल्या पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. त्याचवेळी विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने शानदार पुनरागमन करत शानदार विजयाची नोंद केली. आता दोन्ही संघांमधील चौथा सामना आज (१७ जून) राजकोटमध्ये होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT