India vs South Africa Series eSakal
क्रीडा

तीन फॉरमॅटमध्ये 3 कर्णधार...! आफ्रिका दौरावर संपणार ३१ वर्षांचा दुष्काळ? जाणून घ्या वेळापत्रक अन् सर्व काही

Top News: India vs South Africa T20 Series Begins, 3 Captains in Three Formats...!

Kiran Mahanavar

India vs South Africa Series : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेने करणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी आपला संघ जाहीर केला आहे. पण दक्षिण आफ्रिका दौरा भारतीय संघासाठी नेहमीच कठीण आव्हानांपैकी एक राहिला आहे.

कारण भारतीय संघाला कसोटीतील 31 वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिली कसोटी मालिका 1992 मध्ये येथे झाली होती. 31 वर्षांनंतरही भारत कसोटी मालिका जिंकण्याची प्रतीक्षा करत आहे.

आगामी दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. मेन इन ब्लूमध्ये टी-20, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये तीन वेगवेगळे कर्णधार असतील. सूर्यकुमार यादव टी-20 संघाचे नेतृत्व करणार आहे. केएल राहुल वनडेत कर्णधार असेल. तर कसोटी मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. त्यावेळी विराट कोहलीही संघाचा भाग असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने पण टी-20 वनडे आणि कसोटी मालिकेसाठीही आपला संघ जाहीर केला आहे. एडन मार्कराम टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व करेल, तर टेंबा बावुमा कसोटीत संघाचे नेतृत्व करेल. तो वनडे आणि टी-20 मालिकेत खेळणार नाही. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरला टी-20 मालिकेने होणार आहे. वेळापत्रक व इतर माहिती जाणून घ्या सर्व काही....

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक

3 सामन्यांची एकदिवसीय टी-20 मालिका 10 ते 14 डिसेंबर

  • पहिला टी-20- 10 डिसेंबर - संध्याकाळी 7:30 वाजता

  • दुसरा टी-20- 12 डिसेंबर - रात्री 8:30 वाजता

  • तिसरा टी-20- 14 डिसेंबर - रात्री 8:30 वाजता

3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 17 ते 21 डिसेंबर

  • पहिला एकदिवसीय - 17 डिसेंबर - दुपारी 1:30 वाजता

  • दुसरी वनडे- 19 डिसेंबर - संध्याकाळी 4:30 वाजता

  • तिसरी एकदिवसीय- 21 डिसेंबर - संध्याकाळी 4:30 वाजता

2 सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024

  • पहिली कसोटी- 26-30 डिसेंबर - दुपारी 1:30 वाजता

  • दुसरी कसोटी- 3-7 जानेवारी - दुपारी 1:30 वाजता

(Complete schedule of India's tour of South Africa)

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ

  • टी-20 साठी भारतीय संघ - यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.

  • वनडेसाठी भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.

  • कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद कुमार. जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

  • दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ - एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी , डोनोव्हन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझार्ड विल्यम्स.

  • दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ - एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डी जोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन के डर, विल्यम ड्युसेन, ली व्हिलेज.

  • दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल.

(All Indian and South African teams for all formats)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT