india vs south africa
india vs south africa 
क्रीडा

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठी रोहितचा मास्टर प्लॅन; 'या' खेळाडूची संघात एंट्री

Kiran Mahanavar

India vs South Africa T20 Series: टी20 विश्वचषक आधी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र याआधी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू दीपक हुड्डा दुखापतग्रस्त झाला आहे. तर भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आजून ही तो कोरोनातून बरा झाला नाही.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळाली आहे. कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याच्यासोबतची खास गोष्ट म्हणजे तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. याआधीही त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरला याआधी स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते.आता त्याचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरने आपल्या बॅटने अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, शमी कोविड-19 मधून बरा झालेला नाही. त्याला आणखी वेळ हवा आहे आणि त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून बाहेर असेल. दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी शमीच्या जागी उमेश यादव संघात राहील.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT