क्रीडा

Ind vs Sa U19 WC 2024 : सेमीफायनल सामन्यात द. आफ्रिकाविरुद्ध भारताने जिंकली नाणेफेक! संघात एक बदल, जाणून घ्या प्लेइंग-11

Kiran Mahanavar

India vs South Africa U19 World Cup 2024 Semi Final : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंडर-19 वर्ल्ड कपचा पहिला उपांत्य सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे. या संपूर्ण स्पर्धेत संघ अपराजित असून मागील सलग पाच सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

भारतीय कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. नमन तिवारीचे संघात पुनरागमन झाले आहे.

कर्णधार उदय म्हणाला की, गोलंदाजांना सकाळी थोडी मदत मिळते. अनेकदा आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती, पण आम्ही नाणेफेक गमावल्यामुळे आम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागत होती. आम्ही पूर्णपणे तयार आहोत.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11 :

भारत : उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी.

दक्षिण आफ्रिका : युआन जेम्स (कर्णधार), क्वेना माफाका, दिवान माराईस, नकोबानी मोकोएना, रिले नॉर्टन, लुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), रिचर्ड सेलेट्सवेन, स्टीव्ह स्टोक्स, डेव्हिड टेगर, ऑलिव्हर व्हाइटहेड, ट्रिस्टन लुस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Student Protest: भीतीपेक्षा मोठा होता विद्यार्थ्यांचा आवाज! घरच्यांना न सांगता जंतरमंतरवर पोहोचली नम्रता; आंदोलनात झाली सहभागी

Mumbai Rain: मुंबईकरांची जीवनवाहिनी कोलमडली! विरार-डहाणू लोकलसेवा पूर्णतः बंद; प्रवाशांचे हाल

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

SCROLL FOR NEXT