india vs south africa updates odi cricket match gqeberha sport Sakal
क्रीडा

SA vs IND : दक्षिण आफ्रिकेची विजयासह बरोबरी; भारतीय संघावर ८ विकेट राखून मात

पहिल्या एकदिवसीय लढतीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मंगळवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत सपाटून मार खावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

गेबेरहा (दक्षिण आफ्रिका) : पहिल्या एकदिवसीय लढतीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मंगळवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत सपाटून मार खावा लागला. यजमान दक्षिण आफ्रिकन संघातील गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केल्यानंतर रिझा हेंड्रिक्स (५२ धावा),

टोनी झोरझी (नाबाद ११९ धावा) व रॅसी वॅन डर ड्युसेन (३६ धावा) या फलंदाजांनी शानदार कामगिरी करीत ८ विकेट राखून विजयावर शिक्कामोर्तब केला. दक्षिण आफ्रिकन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

भारताकडून दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. हेंड्रीक्स व टोनी या सलामी जोडीने १३० धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात करून दिली. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर हेंड्रिक्स ५२ धावांवर बाद झाला.

त्यानंतर टोनी व ड्युसेन या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्‍चित केला. टोनीने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने १२२ चेंडूंमध्ये नाबाद ११९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार ६ षटकार मारले. ड्युसेन याने ३६ धावा करून त्याला उत्तम साथ दिली.

याआधी दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नांद्रे बर्गरच्या पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाड याने चौकार मारत दमदार सुरुवात केली, पण पुढच्याच चेंडूवर तो पायचीत बाद झाला.

ऋतुराज याने तिसऱ्या पंचांची मागणी केली, पण रिप्लेमध्ये तो बाद असल्याचे दिसून आले. त्यानंतर साई सुदर्शन याने तिलक वर्मा याच्यासोबत ४२ धावांची भागीदारी रचली. बर्गरच्याच गोलंदाजीवर तिलक १० धावांवर बाद झाला. आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याने विकेट गमावली.

साई सुदर्शन व के. एल. राहुल या जोडीने ६८ धावांची भागीदारी करताना भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असताना लिझाड विलियम्सच्या गोलंदाजीवर साई सुदर्शन ६२ धावांवर बाद झाला. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दुसरे अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने ७ चौकार व १ षटकार मारला.

९७ धावांत सात फलंदाज बाद

साई सुदर्शन हा भारताचा तिसरा फलंदाज ११४ धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर ९७ धावांमध्ये भारताने सात फलंदाज गमावले. के. एल. राहुलने ६४ चेंडूंमध्ये ५६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सात चौकार मारले,

पण इतर फलंदाजांना ठसा उमटवता आला नाही. संजू सॅमसनला याही लढतीत चमक दाखवता आली नाही. संजू सॅमसन १२; तर रिंकू सिंग १७ धावांवर बाद झाला. ब्यूरॅन हेंड्रिक्सने सॅमसनला, बर्गरने राहुलला आणि केशव महाराजने रिंकूला बाद केले. भारताचा डाव २११ धावांवर संपुष्टात आला. नांद्रे बर्गर याने ३० धावा देत तीन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक

भारत ४६.२ षटकांत सर्व बाद २११ धावा (ऋतुराज गायकवाड ४, साई सुदर्शन ६२, तिलक वर्मा १०, के. एल. राहुल ५६, संजू सॅमसन १२, रिंकू सिंग १७, अक्षर पटेल ७, कुलदीप यादव १, अर्शदीप सिंग १८, आवेश खान ९, मुकेशकुमार नाबाद ४, नांद्रे बर्गर ३/३०, ब्यूरॅन हेंड्रिक्स २/३४, केशव महाराज २/५१) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका ४२.३ षटकांत २ बाद २१५ धावा (रिझा हेंड्रिक्स ५२, टोनी झोरझी नाबाद ११९, रॅझी वॅन डर ड्युसेन ३६, अर्शदीप सिंग १/२८, रिंकू सिंग १/२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : इचलकरंजीत घराची भिंत कोसळल्याने पाचजण जखमी

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT