IND vs SL 1st T20 Shubman Gill Shivam Mavi Debut  esakal
क्रीडा

IND vs SL : गुजरात टायटन्सचा शुभमन गिल अन् शिवम मावीला मिळाली टी 20 पदार्पणाची कॅप

अनिरुद्ध संकपाळ

IND vs SL 1st T20 Shubman Gill Shivam Mavi Debut : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याला वानखेडे स्टेडियमवर सुरूवात होत आहे. दरम्यान नाणेफेकीपूर्वी भारतीय संघातील शुभमन गिल आणि शिवम मावीला पदार्पणाची कॅप देण्यात आली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू शिवम मावीला देखील भारताकडून आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

भारताकडून 13 कसोटी आणि 15 वनडे सामने खेळलेल्या शुभमन गिलला अखेर भारताकडून टी 20 फॉरमॅटमध्ये देखील पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. आज (दि.3) श्रीलंकेविरूद्ध वानखेडेवर शुभमन गिल भारताकडून सलामीवीर म्हणून पदार्पण करणार आहे. गिलला संधी मिळाल्यामुळे ऋतुराज गायकवाडला बेंचवर बसावे लागणार आहे. गिल आणि इशान किशन भारताच्या डावाची सुरूवात करतील.

दुसरीकडे भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग निवडीसाठी उपलब्ध नसल्याने शिवम मावीला भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्या नव्या भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारताने या दौऱ्यापासूनच टी 20 वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून आपली संघबांधणी करण्यास सुरूवात केली आहे.

भारताची पहिल्या टी 20 साठीची प्लेईंग 11 :

हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, शिवम मावी, उमरान मलिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Abitkar : पालकमंत्री पहिल्यांदा एवढे चिडले, कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर सगळ्याचं अधिकाऱ्यांना चांगलाच धुतला; काय घडलं नेमकं?

Kolhapur Politics : सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली, मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार?

Vijay Deverakonda Net Worth: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? किती आहे संपत्ती?

मोठी बातमी : भारतात 'चिकन' खाऊन आजारी पडले क्रिकेटपटू; एकाला तातडीने दाखल करावे लागले हॉस्पिटलमध्ये

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वादात; 'क्लब टेंडरिंग'ची चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT