India vs Sri Lanka, 2nd T20I  Sakal
क्रीडा

IND vs SL 2nd T20I : सामन्यात काय घडलं; लंकेचं गणित कुणी बिघडलं!

सकाळ डिजिटल टीम

India vs Sri Lanka, 2nd T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना धर्मशालाच्या मैदानात भारतीय संघाने धमाकेदार विजय नोंदवला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर निसांका 75(53) आणि गुणथिलका 38(29) यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर अखेरच्या षटकात कर्णधार शनाकानं तुफान फटकेबाजी केली. त्याने 19 चेंडूत 47 धावा कुटल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित 20 षटकात 5 बाद 183 धावा केल्या होत्या.

मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीने ही धावसंख्या उत्तम होती. आता जबाबदारी होती ती श्रीलंकन गोलंदाजांवर. चमीरानं रोहितला अवघ्या एका धावेवर बोल्ड करत संघाच्या आशा पल्लवित केल्या. लाहिरु कुमारानं ईशांतला तंबूत धाडत टीम इंडियाला टक्कर देण्यास सज्ज असल्याचे संकेतही दिले. पण श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनने त्यांचं गणित बिघडवले. दोघांनी धमाकेदार खेळ करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले. ही जोडी फोडण्यात उशीर झाला आणि सामना श्रीलंकेच्या हातून निसटला.

  • संजू सॅमसनच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का

    लाहिरु कुमारा याने संजू सॅमसनच्या रुपात सामन्यातील दुसरी विकेट आपल्या नावे केली, संजूनं 25 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 39 धावांचे योगदान दिले

  • श्रेयस अय्यरचं अर्धशतक, टी-20 कारकिर्दीतील पाचव्या अर्धशतकानं सावरला भारताचा डाव

  • ईशान किशनही स्वस्तात माघारी, टीम इंडियाला दुसरा धक्का

    ईशान किशन 16 धावांची भर घालून माघारी, लाहिरु कुमाराच्या गोलंदाजीवर शनाकानं मिडऑनवर घेतला सोपा झेल

  • भारतीय संघाची खराब सुरुवात, रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का

    रोहित शर्मा अवघी एक धाव करुन झाला बाद, चमिरानं उडवल्या दांड्या, मागील सामन्यात रोहित शर्मानं संघाला दमदार सुरुवात करुन दिली होती. त्याचा फ्लॉपशोनंतर आता संघाचा डाव सांभाळण्याची जबाबदारी मध्यफळीवर

  • निर्धारित 20 षटकात श्रीलंकेच्या धावफलकावर 5 बाद 183 धावा, टीम इंडियासमोर 184 धावांचे आव्हान

  • श्रीलंकेच्या कर्णधाराचा धमाका, 19 चेंडूत कुटल्या 47 धावा

  • श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत

भुवीनं निसांकाला दाखवला तंबूचा रस्ता त्याने 75 धावांची दमदार खेळी केली

  • बुमराहची पहिली विकेट, श्रीलंकेनं गमावली चोथी विकेट

जसप्रित बुमराहनं दिनेश चांडीमल याला 9 धावांवर केले बाद; रोहित शर्मानं घेतला झेल

  • भारतीय संघाला तिसरे यश

कमिल मिश्रा अवघ्या एका धावेवर माघारी, अक्षर पटेलनं अवघ्या एका धावेवर त्याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद कले.

  • श्रीलंकेला दुसरा धक्का

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर असलंका गडबडला, पायचित होऊन अवघ्या 2 धावांवर धरला तंबूचा रस्ता

  • श्रीलंकेला पहिला धक्का

रविंद्र जाडेजानं सलामी जोडी फोडली, नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर गुणथिरका माघारी, त्याने 38 धावा केल्या

  • असा आहे श्रीलंकेचा संघ

दनुष्का गुणतिल्का, पाथुम निसांका, चरिथ असलंका, दिनेश चांडिमल, दसुन शनाका, चमिरा करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, प्रविण जयविक्रमे, बिनुरा फर्नांडो, लाहिरु कुमारा

  • असा आहे भारतीय संघ

    रोहित शर्मा, ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल

  • भारतीय संघाचा कर्णधार रोहितनं जिंकला टॉस

    रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच्या सामन्यात श्रीलंकेनं टॉस जिंकून असाच निर्णय घेतला होता. पण त्यांना चेस करायला जमलं नवह्त. भारतीय संघ त्यांना किती धावात रोखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT