India vs Sri Lanka 2nd Test 3rd day Live Cricket Score
India vs Sri Lanka 2nd Test 3rd day Live Cricket Score esakal
क्रीडा

IND vs SL : रोहित सेनेने 2 दिवस 2 सत्रात लंका गुंडाळली; व्हाईट वॉशसह मालिका खिशात

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दोन सत्रातच भारताने लंकेचा दुसरा डाव 208 धावात गुंडाळला. भारताने दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकत दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. रोहित सेनेने घरच्या मैदानावर पाहुण्यांना व्हाईट वॉश देण्याचा सिलसिला कायम ठेवला. भारताकडून दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने भेदक मारा करत 4 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 3 आणि अक्षर पटेलने 2 विकेट घेत लंकेचा दुसरा डाव दोन सत्रात गुंडळण्यात मदत केली.

भारताने (Indian Cricket Team) दुसऱ्या कसेटीवर दुसऱ्याच दिवशी आपली पकड मजबूत केली होती. भारताने आपला दुसरा डाव 303 धावांवर घोषित करत श्रीलंकेसमोर विजयासाठी 447 धावांचे आव्हान ठेवले होते. तिसऱ्या दिवशी लंकेने 1 बाद 28 धावांपासून पुढे खळण्यास सुरूवात केली. मात्र त्यांचा दुसरा डाव 208 धावातच आटोपला. श्रीलंकेकडून करूणारत्नेने झुंजार 107 धावांची शतकी खेळी केली. मात्र भारताच्या भेदक माऱ्यासमोर इतर लंकन फलंदाजांनी नांगी टाकली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने आपल्या पहिल्या डावात 252 धावा केल्या. यात श्रेयस अय्यरची 92 धावांची झुंजार खेळी विशेष ठरली. त्यानंतर भारताने लंकेचा पहिला डाव 109 धावात गुंडाळला. भारताकडून बुमराहने 5 तर अश्विन आणि शामीने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

भारताने आपल्या दुसऱ्या डावात चांगल्या फलंदाजीचे दर्शन घडवले. भारताकडून आक्रमक पंत ( 50) अय्यरने (67) अर्धशतकी खेळी केली. तर रोहित शर्माने 46 धावांची खेळी केली. यामुळे भारताने दुसऱ्या डावात 303 धांवांपर्यंत मजल मारली. भारताने 303 धावांवर डाव घोषित केल्यानंतर लंकेसमोर 447 धावांचे मोठे आव्हान होते. मात्र लंकेचा दुसरा डाव 208 धावात गुंडळाला. यात अश्विनने चकमदार कामगिरी करत 4 तर बुमराहने 3 विकेट घेतल्या.

India vs Sri Lanka 2nd Test दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच्या सर्व घडामोडी

श्रीलंकेचा दुसरा डाव 208 धावात संपला; भारताचा लंकेला 2-0 असा व्हाईट वॉश

206-8 : लंका पराभवाच्या जवळ; अश्विनने लसिथ एम्बुल्डेनियाला 2 धावांवर धाडले माघारी

204-7 : करूणारत्नेला जसप्रीतने दाखवली नाही दया. 107 धावांची शतकी खेळी संपवली.

दिमुथ करूणारत्नेचे झुंजार शतक मात्र भारतीय फिरकपटूंनी विजय केला निश्चित

151-4 : चहापानासाठी खेळ थांबला; भारताला विजयासाठी हव्या फक्त 6 विकेट

दिमुथ करूणारत्नेचे झुंजार अर्धशतक

105-4 जडेजा पाठोपाठ अश्विनचाही लंकेला धक्का; अश्विनने धनंजया डी सिल्वाला 4 धावांवर बाद करत लंकेला चौथा धक्का दिला.

98-3 : रविंद्र जडेजाने लंकेच्या अनुभवी मॅथ्यूजला धाडले 1 धावेवर माघारी

भारताला दुसरे यश; 54 धावा करणाऱ्या कुशल मेंडिसला अश्विनने केले बाद

दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात

भारत तिसऱ्याच दिवशी सामना संपवण्याच्या तयारीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT