Rohit Sharma Sakal
क्रीडा

IND vs WI 1st ODI : सामन्यात काय काय घडलं

Kiran Mahanavar

IND vs WI 1st ODI : टीम इंडियाची हजारी, लतादींदींना श्रद्धांजली वाहून टीम इंडियान केली होती खेळाला सुरुवात 

अहमदाबाद : जगातील सर्वात मोठ्या मैदानात रंगलेल्या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडीजची हवा काढली. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. युजवेंद्र चहलच्या 4 आणि वाशिंग्टनच्या 2 विकेटसह प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजनं केलेल्या अचूक माऱ्यासमोर कॅरेबियन संघाची अवस्था बिकट झाली. जेसन होल्डरच अर्धशतक वगळता एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी बेस्ट इंडीजचा डाव अवघ्या 176 धावांत आटोपला होता. भारतीय संघाला ऐतिहासिक सामना जिंकण्यासाठी अवघ्या 177 धावांचे आव्हान होते. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. (India vs West Indies 1st ODI News Updates)

सुर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डानं दिला फिनिशिंग टच, टीम इंडियाने 6 विकेट्सनं जिकंली पहिली वनडे

  • 116-4 : अल्झारी जोसेफला तिसरे यश, पंतने 11 धावा काढून गाठला तंबूत

  • 115-3 : हुसैन याने टीम इंडियाला दिला तिसरा धक्का, ईशान किशन 36 चेंडूत 28 धावांची खेळी करुन पॅव्हेलियनमध्ये परतला

  • 93-2 : रोहित पाठोपाठ कोहलीही माघारी, दोन चौकार खेचून तोही झाला अल्झारी जोसेफचा शिकार

  • 84-1 : रोहितच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का, 51 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने 60 धावांची खेळी केली

  • 176-10 : जोसेफची विकेट घेत चहलचा चौका, विंडीजचा डाव 176 धावात आटोपला

  • कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक!

  • 167-9 : प्रसिद्ध कृष्णानं होल्डरच्या फटकेबीला लावला ब्रेक, त्याने 71 चेंडूत 4 गगनचुंबी षटकारांसह कुटल्या 57 धावा

  • 157-8 : एलनची विकेट वाशिंग्टन सुंदरच्या खात्यात 29 धावांवर तंबूत

  • 31.2 : चहलचा चेंडू होल्डरचा मिडविकेटवर सिक्स प्रसिद्ध कृष्णाच्या हातातून सुटला झेल

  • वेस्टइंडीज 30 ओव्हर 114 वर 7 बाद

  • 79-7 : प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात पहिली बळी अकेल होसेन भोपळ्यावर परत

  • 78-6 : चहल चा बोलबाला कायम शामरह ब्रूक्स 12 धावा वर तंबूत

  • निकोलस पूरनच्या विकेटसह युझवेंद्र चहलने एकदिवसीय कारकिर्दीतील 100 विकेट पूर्ण

  • 71-5 : कर्णधार पोलार्डचा भोपळा; युजीन त्याला आल्यापावली पाठवले माघारी

  • 71-4 : निकोलस पूरन युजीच्या जाळ्यात फसला, 18 धावा करुन तंबूत

  • 45-3 : एकाच षटका वाशिंग्टन सुंदरला दुसरं यश, डॅरेन ब्रावो 34 चेंडूत 18 धावा करुन बाद

  • 44-2 : ब्रँडन किंग वाशिंग्टन सुंदरच्या जाळ्यात अडकला, 13 धावांवर त्याला तंबूत माघारी परतावे लागले

  • असा आहे भारतीय संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT