नाशिकच्या देवळाली गावातील गणपती मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरी घडली. चोरट्याने मंदिराचे दरवाजे तोडून गणपतीच्या डोक्यावर असलेला एक किलो चांदीचा मुकुट चोरी करून नेला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, संशयित आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये शोध घेतला जात आहे.