Surya Kumar Yadav
Surya Kumar Yadav Sakal
क्रीडा

Surya Kumar Yadav नं फिफ्टीसह नावे केला खास वर्ल्ड रेकॉर्ड

सुशांत जाधव

भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील दुसरा वनडे सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवण्यात येत आहे. टीम इंडीयाचा (Team India) स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवनं (Surya Kumar Yadav) या सामन्यात अर्धशतकी खेळी करुन भारताचा डाव सावरला. त्याने 83 चेंडूत 64 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघ 237 धावांपर्यंत मजल मारु शकला. या खेळीसह सुर्यकुमार यादवच्या नावे खास विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात सुर्यकुमार यादवनं (Surya Kumar Yadav) ची आतापर्यंतची ही सर्वात मोठी इनिंग आहे. वनडेतील पदार्पणापासून खेळलेल्या 6 सामन्यात 30 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विश्व विक्रम त्याच्या नावे झाला आहे. या यादीत ज्यो रुटनं 2013 मध्ये वनडेत पदार्पण केले. यावेळी त्याने पहिल्या सहा डावात 30 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 2017 मध्ये पाकिस्तानच्या फखर झमान, 2010 टॉम कूपर आणि 2006 मध्ये Ryan ten Doeschate याने पदार्पणानंतर 5 सामन्यात 30 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

सुर्यकुमारनं जुलै 2021 मध्ये वनडे संघात पदार्पण केले होते. पहिल्या सामन्यात त्यानं नाबाद 31 धावांची खेळी केली होती. या डावात त्याने 5 चौकार खेचले होते. त्यानंतर त्याने 53,40, 39 आणि नाबाद 34 धावांची खेळी केली. वेस्ट इंडीज विरुद्धच्या अर्धशतकासह त्याने खास विक्रम आपल्या नावे केला. सुर्याचं अर्धशतक, लोकेश राहुलनं केलेल्या 49 धावा आणि अखेरच्या षटकात दीपक हुड्डा आणि वाशिंग्टन यांनी केलेली उपयुक्त छोटेखानी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 9 बाद 237 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT