Rohit Sharma sakal
क्रीडा

Rohit Sharma : live मॅचमध्ये टीम इंडियाला मोठा झटका! रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर

टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी आगामी सामन्यांबाबत टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.

Kiran Mahanavar

India vs West Indies T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी वॉर्नर पार्कवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी आगामी सामन्यांबाबत टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असताना अचानक त्याच्या मांडीच्या स्नायूत ताण आला. वेदना एवढ्या होत्या की त्याला मैदान सोडून मध्येच उपचारासाठी बाहेर जावे लागले.

रोहितने अल्झारी जोसेफला एक षटकार आणि एक चौकार मारून एक धाव घेतली. अचानक हिटमॅन' शर्माच्या पाठीच्या स्नायूमध्ये ताण आला. भारतीय संघाचे फिजिओ कमलेश यांनी मैदानात जाऊन उपचार केले. त्यानंतर काही मिनिटातच रोहित दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. 'हिटमॅन' शर्माच्या पाठीच्या स्नायूमध्ये ताण आल्याचे सांगण्यात येत आहे. तो पुढील दोन सामने खेळू शकणार नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. पुढील दोन सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहेत.

Rohit Sharma

सलामीवीर काईल मायर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने पाच बाद 164 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात सलामीवीर सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज अर्धशतक आणि श्रेयस अय्यरसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे भारताने तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. सूर्यकुमारने (44 चेंडूत 76 धावा) श्रेयस अय्यर 24 धावा केल्या. ऋषभ पंत 26 चेंडूत 33 धावा करून नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

Dombivli: डोंबिवलीत २८वी स्वागतयात्रा; संस्कृती आणि राष्ट्रभावनेचा भव्य संगम, यंदा काय खास ठरलं? जाणून घ्या...

Viral Video : ही तर साक्षात देवीच! निरागस डोळे अन् मोहक हास्य; अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचं हे रूप पाहून तुम्हीही भारावून जाल, व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखो हृदय

Junnar News : जुन्नरमध्ये डॉक्टरकडे खंडणीची मागणी; बेकायदेशीर बांधकामाचा धाक दाखवत ३५ लाखांची मागणी

SCROLL FOR NEXT