india vs west indies t20 sakal
क्रीडा

वेस्ट इंडिजमधल्या राजदूतांकडून कप्तान रोहित शर्माला मिळालं स्पेशल गिफ्ट

टीम इंडियाने सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी सेंट किट्समधील भारतीय उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लावली हजेरी

Kiran Mahanavar

India vs West Indies T20 : टीम इंडिया आणि विंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना नेव्हिस येथील वॉर्नर पार्कवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने विंडीज संघाचा एकतर्फी 68 धावांनी पराभव केला. दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी, प्रशिक्षक राहुल द्रविडसह टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेंट किट्समध्ये भारताचे उच्चायुक्त डॉ. केजे श्रीनिवास यांची भेट घेतली. कप्तान रोहित शर्माला स्पेशल गिफ्ट देखील देण्यात आले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. बीसीसीआयने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, उच्चायुक्त डॉ. केजे श्रीनिवास यांनी आयोजित केलेल्या अधिकृत रिसेप्शनमध्ये टीम इंडिया. या भेटीदरम्यान डॉ. केजे श्रीनिवास यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माला मानचिन्ह प्रदान केले.

विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने भारतीय संघासाठी फलंदाजी करताना शानदार खेळ दाखवला. रोहित शर्माने 44 चेंडूत 64 धावांची खेळी केली, तर दिनेश कार्तिकने 19 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 41 धावांची खेळी केली. या दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाला 190 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले.

प्रत्युत्तरात भारतीय संघाने यजमान विंडीजला निर्धारित 20 षटकांत आठ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 122 धावा करता आल्या. भारतीय संघाने 68 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाकडून रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. टी-20 मालिकेपूर्वी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय मालिकेत विंडीजचा 3-0 असा धुव्वा उडवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT