india vs west indies t20 series usa visa issues america Rohit Sharma sakal
क्रीडा

IND vs WI: रोहित शर्मा अँड टीमला मिळत नाहीय अमेरिकेचा व्हिसा

मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत, ज्याबाबत आता अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत

Kiran Mahanavar

India vs West Indies T20 Series : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या विंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20I मालिका खेळत आहे. मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत, ज्याबाबत आता अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे हे दोन्ही सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भारत आणि वेस्ट इंडिज संघातील अनेक सदस्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही. व्हिसाच्या अडचणींमुळे आता कॅरेबियन क्रिकेट बोर्ड त्यांना त्यांच्याच भूमीवर करवून घेण्याचा विचार करत आहे.

एका सूत्राने सांगितले की, व्हिसा समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. हे सामने वेस्ट इंडिजमध्येही होऊ शकतात. भारत आणि विंडीज यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज सेंट किट्स येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने यजमानांचा 68 धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचे लक्ष्य असेल. दुसरीकडे, निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली विंडीजचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय संघ : रोहित शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, भुवनेश यादव, खान, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग

वेस्ट इंडिजचा संघ : निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, शामराह ब्रूक्स, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, कीमो पॉल, रोमॅरियो शेफर्ड, ओडेन स्मिथ, देवन स्मिथ. थॉमस, हेडन वॉल्श जूनियर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT