Zimbabwe vs India 3rd ODI sakal
क्रीडा

Ind vs Zim ODI : महाराष्ट्राचे खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत; असा असेल इंडियाचा प्लेइंग-11

झिम्बाब्वेविरुद्धच्या आज होणाऱ्या अखेरच्या लढतीत टीम इंडियामध्ये राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता अधिक...

Kiran Mahanavar

Zimbabwe vs India 3rd ODI : के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या दोन लढतींमध्ये अपेक्षेप्रमाणे विजय संपादन करून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने खिशात घातली आहे. त्यामुळे आता झिम्बाब्वेविरुद्धच्या आज होणाऱ्या अखेरच्या लढतीत टीम इंडियामध्ये राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. यजमान झिम्बाब्वे संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी या लढतीत मैदानात उतरणार आहे.

आशियाई करंडकाच्या पार्श्वभूमीवर कर्णधार के. एल. राहुलला फलंदाजीचा सराव करणे अनिवार्य आहे. आयपीएलनंतर तो दुखापत व कोरोनामुळे संघाबाहेरच राहिला आहे. त्यामुळे आशियाई करंडकात थेट उतरवण्याची जोखीम संघ व्यवस्थापन घेईल असे वाटत नाही. पहिल्या लढतीत भारतीय संघ १० गडी राखून विजयी झाला. दुसऱ्या लढतीत राहुलला फलंदाजीचा सराव करण्याची संधी होती, पण व्हिक्टर एनयॉचीच्या गोलंदाजीवर तो १ धावेवरच पायचीत बाद झाला. इशान किशनलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शिखर धवन, शुभमन गिल, दीपक हूडा व संजू सॅमसन यांनी चमक दाखवली आहे. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांनी चोख कामगिरी केली आहे.

ऋतुराज, राहुल हे खेळाडू प्रतीक्षेत

ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी हे महाराष्ट्राचे खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या दोन्ही लढतींमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. शिखर धवन, के. एल. राहुल व शुभमन गिल या अनुभवी खेळाडूंना ऋतुराजआधी सलामीवीर किंवा मधल्या फळीत संधी मिळाली आहे; मात्र मालिका जिंकली असल्यामुळे आता आज तरी ऋतुराजला अंतिम अकरामध्ये संधी देणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT