India Vs Zimbabwe Sikandar Raza From Zimbabwe Should Trouble Men In Blue In ODI Series  Esakal
क्रीडा

ZIM vs IND : भारतीय संघाने 'सिकंदर'पासून राहिले पाहिजे सावध

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Zimbabwe 2022 : भारतीय संघ झिम्बावे दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यावर भारत झिम्बावेविरूद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. आतापर्यंत भारत आणि झिम्बावे यांच्यात 63 सामने खेळले गेले आहेत. भारताने त्यातील 51 सामने जिंकले असून झिम्बावेने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. याचाच अर्थ की काही सामन्यात तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या झिम्बावेने भारताच्या नाकात दम केला होता. (Sikandar Raza From Zimbabwe Should Trouble Men In Blue In ODI Series)

1999 च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बावेने भारताचा 3 विकेट्सनी पराभव केला होता. याचबरोबर 1996 - 97 मध्ये झालेल्या झिम्बावेविरूद्धच्या मालिकेत भारताला 1 - 0 असा मालिका पराभव देखील सहन करावा लागला होता. झिम्बावेच्या काही खेळाडूंनी भारताविरूद्ध दमदार कामगिरी केली आहे. आताच्या झिम्बावे संघात देखील काही असे खेळाडू आहेत जे भारतासमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतात.

झिम्बावेचा सिकंदर घालतोय धुमाकूळ

भारत आणि झिम्बावे मालिकेत झिम्बावेच्या सिकंदर रझावर (Sikandar Raza) सर्वांची नजर असणार आहे. सध्याच्या घडीला रझा चांगल्या धावा करत आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरूद्धच्या वनडे मालिकेत सिकंदर रझाने 2 सामन्यात 2 शतकी खेळी केल्या. त्याने सलग दोन सामन्यात दोन53 शतके ठोकली. याचबरोबर त्याने बांगलादेश विरूद्धच्या टी 20 मालिकेत देखील दमदार फलंदाजी केली. त्याने पहिल्या टी 20 सामन्यात 65 धावांची नाबाद खेळी केली. तर दुसऱ्या टी 20 सामन्यात 53 चेंडूत 62 धावांची खेळी केली. तिसऱ्या टी 20 सामन्यात मात्र त्याला खातेही उघडता आले नाही.

सिकंदरने आपल्या गेल्या 6 वनडे डावात एकूण 379 धावा केल्या आहेत. भारताविरूद्धच्या मालिकेत देखील तो हा चांगला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. सिकंदर सध्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये 29 व्या स्थानावर आहे. ही त्याची वनडे मधील सर्वश्रेष्ठ रँकिंग आहे. याचबरोबर सिकंदरने हा वनडे ऑल राऊंडर रँकिंगमध्ये देखील 7 स्थानांची उडी घेत चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भारत आणि झिम्बावे यांच्यातील पहिला वनडे सामना 18 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT