mithali raj retirement harmanpreet kaur captain  
क्रीडा

मिताली राजनंतर हरमनप्रीत कौरवर संभाळणार संघाची जबाबदारी

मिताली राजच्या निवृत्तीनंतर आता वनडे मध्ये कोण कर्णधार होणार बीसीसीआयने केले स्पष्ट

Kiran Mahanavar

Mithali Raj Retirement Harmanpreet Kaur Captain: भारतीय महिला क्रिकेटची महान खेळाडू मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे.

मिताली राजच्या निवृत्तीनंतर आता वनडे मध्ये कोण कर्णधार होणार हे पण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. मिताली राजच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अखिल भारतीय महिला निवड समितीची बुधवारी बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारत दांबुला आणि कॅंडी यांच्याबरोबर तीन T-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत.

हरमनप्रीत कौरला निवड समितीने महिला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवलं आहे. आधीपासूनच हरमनप्रीत भारतीय महिला टी-20 संघाचे नेतृत्व करत होती. याशिवाय मिताली राजच्या अनुपस्थितीत हरमनप्रीतने संघाचे नेतृत्वही केले आहे. त्यामुळे तिच्याकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. स्मृती मंधानाला दोन्ही संघाची उपकर्णधार बनवण्यात आली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा 23 जून ते 7 जुलैला सुरू होणार आहे. पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना 23 जून रोजी डंबुला येथे खेळवला जाईल, दुसरा सामना 25 जूनला आणि तिसरा सामना 27 जूनला त्याच मैदानावर होणार आहे. एकदिवसीय मालिका कॅंडी येथे खेळली जाईल, ज्याचा पहिला सामना 1 जुलै रोजी, दुसरा सामना 4 जुलै रोजी आणि तिसरा सामना 7 जुलै रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT