FIH Hockey5s Women's World Cup esakal
क्रीडा

FIH Hockey5s Women's World Cup : भारतीय महिला हॉकी संघ पोहचला फायनलमध्ये; रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव

अनिरुद्ध संकपाळ

India Women hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच हॉकी 5 एस महिला वर्ल्डकप (FIH Hockey5s Women's World Cup) स्पर्धेची फायनल गाठली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 6 - 3 असा पराभव केला.

भारताकडून अक्षता ढेकालेने सातव्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल केला. त्यानंतर मारिआना कुजूरने 11 व्या मिनिटाला, मुमताझ खानने 21 व्या, ऋतुजा पिसाळने 23 व्या, ज्योती छेत्रीने 25 व्या तर अजिमा कुजूरने 26 व्या मिनिटाला गोल केले.

दक्षिण आफ्रिकेकडून टेशवान दे ला रेने 5 व्या मिनिटाला गोलं करत आफ्रिकेचे खाचे उघडले होते. त्यानंतर कर्णधार टोनी मार्कने 8 व्या आणि कॅमबेरलैनने 29 व्या मिनिटाला तिसरा गोल केला. आफ्रिकेने सुरूवातीला बचावात्मक पवित्रा घेतला होता. मात्र त्यांनी पहिल्या हाफमध्ये आधी गोल करत आघाडी घेतली होती.

मात्र भारताने दक्षिण आफ्रिकेची ही आघाडी त्वरित बरोबरीत बदलली. मात्र टोनी मार्कने पुन्हा आफ्रिकेला आघाडी मिळवून दिला. ही आघाडी मारिआना कुजूरने त्वरित 2 - 2 अशी बरोबरीत बदलली.

दुसऱ्या हाफमध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरूवात केली. त्यांनी भारताची गोलकिपर रजनीची परीक्षा पाहिली. मात्र भारताने आपला भक्कम बचाव केला. त्यानंतर ऋतुजाने मुमताझच्या साथीने भारताला आघाडी मिळवून देण्या सुरूवात केली. या दोघांनी भारताची आघाडी वाढवली.

दक्षिण आफ्रिका देखील गोलची परतफेड करण्यासाठी काऊंटर अटॅक करत होता. मात्र ज्योतीने दबावात चांगला खेळ करत भारताला 5 - 2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अजिमाने ही आघाडी 6 - 2 अशी केली अखेर आफ्रिकेकडून कॅमबेरलैनने शेवटचा गोल केला. मात्र हा गोल भारताचा विजय रोखू शकला नाही. आता फायनलमध्ये भारतीय संघ रविवारी नेदरलँड्स सोबत भिडणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

Winter Weather Severe : पुढील आठ दिवस हाडे गोठवणारी थंडी पडणार, वेधशाळेचा अंदाज; थंडीची लाट कायम

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदारांची राजन पाटलांना वॉर्निंग

International Men's Day: अल्फा, बीटा की सिग्मा... पुरुषांनो तुम्ही कोणत्या पर्सनॅलिटी टाईपमध्ये मोडता?

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

SCROLL FOR NEXT