ENGW vs INDW icc twitter
क्रीडा

ENGW vs INDW : शफालीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी!

भारतीय महिला संघ तब्बल सात वर्षांनी कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

सुशांत जाधव

India Women tour of England 2021 : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील कसोटी सामन्याला सुरुवात झालीये. ब्रिस्टलच्या मैदानात यजमान इंग्लंड महिला संघाची कर्णधार संघाने हेदर नाईट Heather Knight हिने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला संघ तब्बल सात वर्षांनी कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरीने चर्चेत आलेली शफाली वर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या वनडेत शफाली वर्माला संधी देण्यात आली नव्हती. मात्र इंग्लंडमध्ये तिला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. शफाली वर्मासह (Shafali Verma) भारतीय महिला संघात दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर आणि तानिया भाटिया यांनी कसोटी पदार्पण केले. स्नेह राणाला पाच वर्षानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर 2014 मध्ये घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी एका डावाने विजय नोंदवला होता. त्यानंतर भारतीय संघ आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. भारतीय महिला संघाचे इंग्लंडमधील रेकॉर्ड उत्तम आहे. त्यामुळे यजमानांपेक्षा त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे सामन्यात शफालीला संधी न दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत करण्यात आले होते. त्यानंतर आता शफालीला संघात घेतले असून तिच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियातही कसोटी खेळणार आहे. त्यामुळे या एकमेव कसोटीत दिमाखदार कामगिरी करण्यासाठी संघ प्रयत्नशील असेल.

India Women (Playing XI): स्मृती मानधना, शफाली वर्मा, पुनम राऊत, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, दिप्ती शर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (विकेटकिपर), झुलन गोस्वामीस, पूजा वस्त्राकर, शिखा पांड्ये.

England Women (Playing XI): लॉरेन विनफिल्ड हिल, टॅमी ब्यूमॉन्ट, हेदर नाईट (कर्णधार), नताली सायव्हर, अ‍ॅमी एलेन जोन्स(विकेटकिपर),सोफिया डन्कले, जॉर्जिया एल्विस, कॅथरीन ब्रंट, अन्या श्रुबसोले, सोफी इक्लेस्टोन, केट क्रॉस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT