Smriti Mandhana  Twitter
क्रीडा

VIDEO : स्मृतीनं घेतलेला जबऱ्या कॅच एकदा पाहाच

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

सुशांत जाधव

भारतीय संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत लयीत दिसली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना सारा ग्लेन हिने तिलाच पायचित केले. अवघ्या एका धावनं तिचं अर्धशतक हुकले. तिने 57 चेंडूत 8 चौकाराच्या मदतीने 49 धावांची खेळी केली. बॅटिंगला येण्यापूर्वी तिने अप्रतिम क्षेत्ररक्षणाने लक्ष वेधून घेतले. इंग्लंडच्या डावातील 38 व्या षटकात स्मृती मानधनाने कमालीचा कॅच पकडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. (India Women vs England Women 3rd ODI Smriti Mandhana Take Brilliant Catch Of Natalie Sciver Watch Video)

भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंगवेळी स्मृतीने नॅटली सिवर हिचा अप्रतिम कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले. स्मृतीने डाइव्ह मारत घेतलेल्या जबरदस्त कॅचमुळे नॅटलीला 49 धावांवर तंबूचा रस्ता धरावा लागला. दीप्ति शर्माच्या गोलंदाजीवर स्मृतीने आपल्यातील फिल्डिंगचा अप्रतिम नजराणा पेश केला.

वॉर्सेस्टरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे 47-47 षटकांचा सामना खेळवण्यात आला. मिताली राजने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडची कर्धार हिथर नाईट 46, लॉरेन्स विनफील्ड 36 धावा करुन परतल्यानंतर नॅटली सिवरने 49 धावांची खेळी केली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर स्मृती मानधनाने तिचा जबरदस्त कॅच घेतला. त्यानंतर इंग्लंडचा संघ कोलमडला. 219 धावांत संघ आटोपला. भारतीय संघाने या धावांचा पाठलाग करत सामना खिशात घातला. अप्रतिम फिल्डिंगनंतर स्मृतीने फलंदाजीतही मोलाचे योगदान दिले. तिने 49 धावा करुन संघाचा डाव सावरला. टी-20 मालिकेपूर्वी स्मृतीच्या ताफ्यातून पाहायला मिळालेली फटकेबाजी भारतीय संघासाठी फायदेशीर अशीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT