India Women vs South Africa Women sakal
क्रीडा

IND vs SA: पावसाचा तांडव! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द

पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पंचांनी सामना रद्द

Kiran Mahanavar

India Women vs South Africa Women : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिलांचा त्रिकोणी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना शनिवारी पावसामुळे रद्द करावा लागला. हे दोन्ही संघ गुरुवारच्या अंतिम फेरीसाठी आधीच पात्र ठरले आहेत आणि त्यामुळे येथील सामना विजेतेपदाच्या लढतीपूर्वी 'ड्रेस रिहर्सल'सारखा होता. या सामन्यात पावसामुळे केवळ दोनच षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये भारताने बिनबाद चार धावा केल्या.

जेमिमा रोड्रिग्सने मलाबाच्या चेंडूवर चौकार मारून भारताचे खाते उघडले. दुस-या टोकाला स्मृती मानधना खाते उघडू शकली नव्हती. पहिल्या तीन सामन्यांतून बाहेर राहिल्यानंतर या सामन्यात शबनिमचे पुनरागमन झाले. भारताची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरनेही सप्टेंबरनंतरच्या या सामन्यात पुनरागमन केले, मात्र पावसामुळे तिला मैदानातही उतरता आले नाही.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वस्त्राकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. भारत तीन सामन्यांनंतर अपराजित आहे. सोमवारी त्यांचा गट टप्प्यातील शेवटचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

Mundhwa Land Scam : शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीला समन्स; खारगे समितीपुढे सुनावणी, व्यवहाराची इत्थंभुत माहिती घेणार

Rising Star Asia Cup 2025 : भारत 'अ' संघाचा ओमान 'अ' संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय, सेमिफानलचं तिकीट केलं पक्क...

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

Ajit Pawar : मिळकतकराचा तिढा दोन दिवसांत सुटणार; समाविष्ट गावांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे अजित पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT