India Womens Cricket Team Defeat Pakistan  esakal
क्रीडा

INDW vs PAKW: पाकची पाटी कोरीच; मोठ्या विजयाने भारताची वर्ल्डकप मोहिम सुरू

अनिरुद्ध संकपाळ

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महिला वर्ल्डकप (ICC Women's World Cup 2022) सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 245 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला क्रिकेट (Pakistan Women Cricket Team) संघाची दमछाक झाली. पाकिस्तानचा सर्व संघ 137 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताने 107 धावांनी मोठा विजय साजरा केला. भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान महिला क्रिकेट संघाविरूद्धचे आपले 100 टक्के विनिंग पर्सेंटेज कायम राखले. भारताची डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने (Rajeshwari Gayakwad) पाकिस्तानच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या रणनीतीत चांगलेच अडकवले. तिने 31 धावात 4 बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 7 बाद 244 धावा उभारल्या. भारताकडून पूजा वस्त्रकारने (Pooja Vastrakar) धडाकेबाज फलंदाजी करत 67 धावांची खेळी केली. तिला स्नेह राणाने (Sneh Rana) 53 धावांची अर्धशतकी खेळी करून चांगली साथ दिली. विशेष म्हणजे चांगल्या सुरूवातीनंतर भारताची मधील फळी ढेपाळली होती. त्यानंतर या दोघींनी सातव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी रचली होती. सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) देखील 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिने दिप्ती शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी रचली. यानंतर मात्र पाकच्या गोलंदाजांनी भारताची अवस्था 1 बाद 92 धावांवरून 6 बाद 114 धावा अशी केली होती.

भारताने ठेवलेल्या 245 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. त्यांचा निम्मा संघ अवघ्या 70 धावात माघारी फिरला होता. त्यानंतर त्यांनी रडत खडत शतकी मजल मारली. तळातील फलंदाज बेगने 24 धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तान 137 धावांपर्यंत मजल मारू शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

Talegaon Abuse Case : बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून एकास अटक!

AUS vs IND, 4Th T20I: अर्शदीपने ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा अफलातून कॅच घेतला अन मॅच भारताकडे फिरली; पाहा टर्निंग पाँइंट ठरलेला क्षण

SCROLL FOR NEXT