India Women's Cricket Team Defeat Sri Lanka Won Series By 3 - 0 Rajeshwari Gayakwad Shine esakal
क्रीडा

SLW Vs INW : राज्य 'राजेश्वरी'चेच! लंकेला दिला व्हाईट वॉश

अनिरुद्ध संकपाळ

पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने लंकेला 3 - 0 असा व्हाईट वॉश दिला. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 256 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान लंकेला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 216 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने (Rajeshwari Gayakwad) 3 तर मेघना सिंह आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेकडून निलाक्षी डिसेल्वाने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर चामरी आटापटू (42) हसिनी परेरा (39) यांनी देखील प्रतिकार केला. (India Women's Cricket Team Defeat Sri Lanka Won Series By 3 - 0)

भारताचे 256 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. त्यानंतर मात्र चामरी आटापटूने डाव सावरण्यास सुरूवात केली. तिने 44 धावांची खेळी केली. मात्र कर्णधार हरमनप्रीतने कर्णधार आटापटूला बाद करत मोठा धक्का दिला. दरम्यान, हसिनी परेराने 39 धावा करत डाव सावला. मात्र राजेश्वरी गायकवाडने परेराला बाद करत लंकेच्या आशेला सुरूंग लावला. त्यानंतर मधल्या फळीला फारशी चमक दाखवता आली नाही. दुसऱ्या बाजूने निलाक्षी डिसेल्वाने नाबाद 48 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. मात्र दुसऱ्या बाजूने तिला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. अखेर भारताने लंकेचा डाव 47 व्या षटकात 216 धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने 3 तर मेघना सिंह आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, श्रीलंकेने भारताला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. भारताने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 256 धावांचे आव्हान उभारले. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्मा (49) आणि पूजा वस्त्राकर (नाबाद 56) यांनी देखील आपले योगदान दिले. लंकेकडून रणवीरा, रश्मी डिसेल्वा आणि आटापटू यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT