India Women's Defeat Bangladesh in Women's World Cup  esakal
क्रीडा

INDW vs BANW: स्नेह राणाचा भेदक मारा; सेमी फायनलच्या आशा पल्लवित

सकाळ डिजिटल टीम

हॅमिल्टन: भारताने महिला वर्ल्डकपमधील (ICC Women's World Cup) साखळी फेरीत बांगलादेशचा तब्बल 110 धावांनी पराभव केला. भारताचा (India Women's Cricket Team) हा साखळी फेरीतील तिसरा विजय आहे. या विजयाबरोबरच भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्यामुळे सेमी फायनल गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर (Bangladesh) 230 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र बांगलादेशचा संपूर्ण संघ 119 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताकडून स्नेह राणाने (Sneh Rana) 30 धावात 4 बळी टिपले. तर झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत तिला चांगली साथ दिली. प्रथम फलंदाजी करताना यस्तिका भाटियाने अर्धशतकी (50) खेळी केली होती.

भारताच्या 230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा संघ भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर टिकाव धरू शकला नाही. भारताची फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने बांगलादेशला शर्मिन अख्तरच्या रूपात पहिला धक्का दिला. त्यानंतर पूजा वस्त्रकारने फरगनाला बाद करत बांगलादेशची अवस्था 2 बाद 15 धावा अशी केली. दरम्यान, कर्णधार मिताली राजने चेंडू स्नेह राणाच्या हाती सोपवला तिने आपल्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशला ओढले.

दरम्यान, बांगलादेशकडून लता मंडल (24) आणि सलमा खातून (32) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी अनुभवी झुलन गोस्वामीने फोडली. त्यानंतर पूजा वस्त्रकारने लता मंडलला बाद करत हा प्रतिकारही मोडून काढला. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक 4 बळी टिपले तिला झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्रकारने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. भारताचा साखळी फेरीतील अखेरचा सामना आता दक्षिण आफ्रिकेसोबत 27 मार्चला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

Raj Thackeray: निवडणूक की लिलाव? १५ कोटींची ऑफर, तरीही नकार! पैसे वाटपावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

सोलापुरातील धक्कादायक घटना! रिमांड होममधून अल्पवयीन मुलगा, तर घरगुती वादातून सखी वन टॉप सेंटरमध्ये आलेली विवाहिता बेपत्ता; पोलिस घेत आहेत दोघांचा शोध

Mumbai Politics: आरोप, वस्तुस्थिती आणि राजकीय संदर्भ... मुंबई खरंच विकली जातेय का? अदानी समूहावर बोट; पण वास्तव काय सांगतं?

Puja Khedkar Robbery : पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर मध्यरात्री दरोडा; नोकरानेच आखला कट!

SCROLL FOR NEXT