Davis Cup Tennis sakal
क्रीडा

Davis Cup Tennis : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा ; डेव्हिस चषक टेनिस,४-० विजयासह जागतिक गटात (एक) प्रवेश

भारताच्या टेनिस संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. पाकिस्तानचा ४-० असा धुव्वा उडवून भारतीय संघाने डेव्हिस चषक जागतिक गटात (एक) प्रवेश केला. या पराभवामुळे पाकिस्तानला आता जागतिक गटात (दोन) यामध्येच राहावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद : भारताच्या टेनिस संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. पाकिस्तानचा ४-० असा धुव्वा उडवून भारतीय संघाने डेव्हिस चषक जागतिक गटात (एक) प्रवेश केला. या पराभवामुळे पाकिस्तानला आता जागतिक गटात (दोन) यामध्येच राहावे लागणार आहे.

युकी भांब्री-साकेत मायनेनी या भारताच्या जोडीने सकाळच्या सत्रात पुरुष दुहेरीच्या लढतीत पाकिस्तानच्या अकील खान-मुजामिल मूर्तझा या जोडीवर ६-२, ७-६ असा विजय साकारला. या विजयामुळे भारताचा या लढतीतील विजय निश्‍चित झाला. या लढतीसाठी पाकिस्तानच्या संघात बरकत उल्लाह याची निवड करण्यात आली होती, पण आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी बरकत याला डच्चू देऊन अकील खान याची निवड करण्यात आली, पण युकी भांब्रीचा अनुभव व साकेय मायनेनी याची दमदार सर्व्हिस याचे आव्हान पाकिस्तानच्या जोडीला परतवून लावता आले नाही. दोनच सेटमध्ये त्यांचा पराभव झाला.

पुरुष एकेरीच्या परतीच्या लढतीसाठी भारताकडून निकी पुनाचा याची निवड करण्यात आली. या लढतीत निकी याने मुहम्मद शोएब याच्यावर ६-३, ६-४ असा दमदार विजय मिळवला. शोएबचे सर्व्हिसवर वर्चस्व नव्हते, पण त्याचा बॅकहँडचा फटका जबरदस्त होता, पण निकी याने त्याला बॅकहँडला फटके खेळता येईल असा खेळ केलाच नाही. अखेर निकी याने चौथ्या लढतीत विजय मिळवून भारताला ४-० असे पुढे नेले. पुरुष एकेरीची पुढील लढत खेळवण्यात आली नाही.

आठव्यांदा विजय

भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत सात डेव्हिस चषक टेनिसमधील लढती रंगल्या होत्या. या सातही लढतींमध्ये भारताने विजय साकारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT