World Cup 2023 
क्रीडा

World Cup 2023: युझवेंद्र चहलला न घेणं टीम इंडियाचा सेफ झोन? सोशल मीडियावर चर्चा

Sandip Kapde

World Cup 2023: क्रिकेटच्या महासंग्रामासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. पुढील महिन्यात विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. निवडकर्त्यांनी भारतीय संघातून स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहलला बाहेरचा रस्ता दाखवला. युझवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबांची भेट घेत आशिर्वाद घेतले होते. तरी देखील चहलवर कृपा झाली नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. चहलला का वगळले? युझवेंद्र चहलला न घेणं टीम इंडियाचा सेफ झोन? आहे का, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

युझवेंद्र चहल वगळता अन्य दोन खेळाडूंचा आशिया चषक प्लॅनमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला संधी दिली नाही. अष्टपैलू खेळाडू नसल्यामुळे चहलला वगळल्याची चर्चा क्रिडा वर्तुळात आहे. यामुळे युझवेंद्र चहलचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.

नावाचा विचार झाला आहे मात्र अक्षर पटेल फलंदाजी करत त्याच्या पुढे गेला आहे. चहलला पुन्हा एकदा विश्वचषकात खेळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०१९ मध्येही त्यांची निवड झाली नव्हती. तर त्याच्या जागी कुलदीप गेल्या वेळी विश्वचषक खेळला होता आणि यावेळीही त्याचे स्थान निश्चित झाले आहे.

युझवेंद्र चहलला न घेणं टीम इंडियाचा सेफ झोन?

चहलला वगळण्यावर रोहित शर्मा म्हणाला, आम्ही संघाच्या संतुलनावर खूश आहोत. अक्षर आणि जडेजा गोलंदाजी सोबत फलंदाजी देखील करतात. वनडेमध्ये वेगवान गोलंदाज अधिक गोलंदाजी करतात, त्यामुळे आम्ही चार वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. लेग स्पिनर असता तर बरं झाले असते पण हा संघ आम्हाला संतुलन देतो.

बागेश्वर बाबांची घेतली होती भेट -

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री हे देशातील बडे नेते आणि अभिनेते यांना भेटत असतात आणि अनेकदा चर्चेत राहतात. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धीरेंद्र शास्त्री भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहलसोबत दिसत आहेत. व्हिडिओमध्ये युझवेंद्र चहल आपल्या पंडित धीरेंद्र शास्त्रींचे कौतुक करताना दिसत आहे.

बागेश्वर बाबा त्यांच्या कथित चमत्कारांमुळे प्रसिद्ध झाले आहेत. देशातील सर्व राज्यांमध्ये त्यांचे कार्यक्रम होतात. याशिवाय परदेशातही त्यांचे कार्यक्रम आहेत. अनेक नेते आणि अभिनेते त्यांचे चाहते आहेत.

भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT