India Wrestling Squad Asian Games  
क्रीडा

India Wrestling Squad Asian Games: आरोप-प्रत्यारोप, न्यायालयीन लढाई नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कुस्तीपटूंची निवड

पुन्हा हरियाणवीचे वर्चस्व! 18 पैकी 17 कुस्तीपटू हरियाणाचे, एक पंजाबचा

सकाळ ऑनलाईन टीम

India Wrestling Squad Asian Games : आरोप-प्रत्यारोप, न्यायालयीन लढाई व त्यानंतर झालेल्या निवडी चाचणीनंतर अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघ निवडण्यात आला. एकूण १८ कुस्तीपटूंची निवड करण्यात आली असून त्यात ग्रीको-रोमन, पुरुष फ्रीस्टाईल व महिला फ्रीस्टाईलसाठी प्रत्येकी सहा खेळाडूंचा समावेश आहे.

कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या देखरेखीखाली शनिवार व रविवारी झालेल्या निवड चाचणीतील कामगिरीच्या आधारावर या खेळाडूंची निवड करण्यात आली. १८ पैकी बजरंग पुनिया (६५ किलो) व विनेश फोगट (५३किलो) यांना चाचणीतून सूट देण्यात आली होती. त्यांची थेट निवड करण्यात आली.

मात्र, दोघांच्या वजन गटातही चाचणी घेण्यात आली असून त्यातील दोन्ही खेळाडूंना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. टोकियो ऑलिंपिक रौप्यपदक विजेता रवी दहिया मात्र स्थान मिळवू शकला नाही. कारण ५७ किलो वजन गटाच्या पहिल्याच फेरीत आतिश तोडकरने त्याच्यावर मात केली. मात्र, उपांत्य फेरीत आतिशला राहुलकडून मात खावी लागली. यात अमन सेहरावतने राहुलवर मात करून आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीट मिळविले.

दरम्यान, विनेश व बजरंगला चाचणीत सूट कशी दिली या मुद्यावरून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या अंतिम पंघलने ५३ किलो वजन गटात वर्चस्व गाजविले. २० वर्षे वयोगटातील जागतिक विजेती असलेल्या अंतिमने चाचणीतील अंतिम लढतीत मंजूवर मात केली. मात्र, तिला स्टँडबाय राहावे लागेल.

भारतीय संघ ः ग्रीको रोमन - ग्यानेंद्र (६० किलो), नीरज (६७ किलो), विकाश (७७ किलो), सुनील कुमार (८७ किलो), नरींदर चिमा (९७ किलो), नवीन (१३० किलो). महिला फ्रीस्टाईल - पूजा गहलोत (५० किलो), विनेश फोगट (५३ किलो), मानसी अहलावत (५७ किलो), सोनम मलिक (६२ किलो), राधिका (६८ किलो), किरण (७६ किलो). पुरुष फ्रीस्टाईल - अमन सेहरावत (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), यश (७४ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), विक्की (९७ किलो), सुमीत (१२५ किलो).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT