Asian Games 2023 Badminton esakal
क्रीडा

Asian Games 2023 : बॅडमिंटनमध्ये भारताने इतिहास रचला, तब्बल 37 वर्षांनी येणार पदक

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारतीय बॅडमिंटन पुरूष संघाने नेपाळचा क्वार्टर फायनलमध्ये 3 - 0 असा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. याचबरोबर भारतीय संघाने आपले पदक देखील निश्चित केले. पुरूष संघाने एशियन गेम्समध्ये तब्बल 37 वर्षांनी पदक निश्चित केलं आहे. भारताच्या मिथून मनजुनाथने बिष्णू कटुवालचा तिसऱ्या सामन्यात पराभव केला. आता भारतीय संघ इंडोनेशिया आणि कोरिया यांच्यातील विजेत्यासोबत सेमी फायनलमध्ये भिडणार आहे.

भारताने आज टेनिस पाठोपाठ बॅडमिंटनमध्ये देखील पदक निश्चित केलं आहे. भारताने एशियन गेम्समध्ये सहाव्या दिवशी आतापर्यंत 32 पदके जिंकली आहेत. त्यात 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य पदकांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक 18 पदके ही शुटिंगमध्ये आली आहेत. यात 6 सुवर्ण 7 रौप्य तर 5 कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारताने क्रिकेटमध्ये 1 तर इक्वेस्टेरियनमध्ये 2 (1 सुवर्ण 1 कांस्य), रोईंगमध्ये 5 (2 रौप्य, 3 कांस्य), सेलिंगमध्ये 3 (1 रौप्य, 2 कांस्य), वुशू 1 रौप्य, टेनिस 1 रौप्य, स्क्वॅश 1 कांस्य पदक जिंकले.

भारताने एशियन गेम्समध्ये आज सहाव्या दिवशी नेमबाजीत पुरूष आणि महिला दोन्ही संघांनी आणि वैयक्तिक प्रकारात पदकांची लयलूट केली. पलक आणि इशा सिंह यांनी 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले. याचबरोबर इशा, पलक आणि दिव्या या महिला संघाने दिवसातील पहिले पदक जिंकून दिले होते. त्यांनी महिला 10 मीटर एअर पिस्टल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावले.

याचबरोबर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने पुरूष रायफल 3 पोजिशन वैयक्तिक प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी पुरूष रायफल 3 पोजिशन सांघिक प्रकारात भारतीय संघाने वर्ल्ड रेकॉर्ड तोडत सुवर्णवेध घेतला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT