Shahid Afridi 
क्रीडा

Shahid Afridi : "मटण खायला सुरू केलं म्हणून..." भारतीय बॉलर्सच्या कामगिरीवरून आफ्रिदीचे वादग्रस्त विधान

Kiran Mahanavar

Shahid Afridi : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कप 2023 मध्ये चमकदार कामगिरी करत विजेतेपदही पटकावले. सध्या टीम इंडिया वनडेमध्‍ये जगातील नंबर 1 टीम आहे आणि एकदिवसीय वर्ल्डकप 2023 मध्ये भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय नोंदवला.

दरम्यान, माजी दिग्गज खेळाडू आणि पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने टीम इंडियाच्या बॉलर्सच्या कामगिरीवरून वादग्रस्त विधान केले आहे. तो म्हणाला की, मांसाहारामुळे टीम इंडियाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. त्याने भारतीय संघाच्या गोलंदाजीतील सुधारणेचा संबंध मांसाहाराशी जोडला आहे.

एका लोकल स्पोर्ट्स शोमध्ये बोलताना आफ्रिदीने आठवण करून दिली की पूर्वी पाकिस्तान घातक खेळाडू तयार करत होते, परंतु भारत सध्या त्या स्थितीत आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला की, भारतीय गोलंदाजांनी आता मांसाहार खायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याची ताकद वाढली आहे. गेल्या काही वर्षांवर नजर टाकली तर भारताकडे जास्त महान वेगवान गोलंदाज नव्हते, पण आता हा ट्रेंड बदलत आहे. भारताकडे आता जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसारखे सर्वोत्तम गोलंदाज आहेत.

माजी पाकिस्तानी कर्णधाराने भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी सौरव गांगुलीचे महत्त्व एमएस धोनीच्या निदर्शनास आणून दिले. शाहिद आफ्रिदीने सांगितले की, याआधी सौरव गांगुलीने कर्णधार असताना खूप बदल केले. मग एमएस धोनीने ज्या प्रकारे सर्व वरिष्ठांना सोबत ठेवले ते कौतुकास्पद आहे. यादरम्यान बीसीसीआयनेही अनेक योग्य पावले उचलली. यामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांचे आयोजनही समाविष्ट आहे. येथे देशांतर्गत क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते.

तो पुढे म्हणाला की, बीसीसीआयने संपूर्ण देशांतर्गत क्रिकेटची जबाबदारी राहुल द्रविडसारख्या दिग्गज खेळाडूकडे दिली आहे. खेळाडूंना कसे तयार करायचे हे त्यांना माहीत आहे. त्याने खूप मेहनत घेतली, त्यामुळेच आता भारताचे 2 संघ तयार झाले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे यापूर्वी एनसीएची जबाबदारी होती. आता माजी दिग्गज क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण हे काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT