Indian Boxer sakal
क्रीडा

Indian Boxer : शिव, अमित, सचिन उपांत्यपूर्व फेरीत

शिव थापा, सचिन व अमित कुमार या भारतीय खेळाडूंनी आशियाई एलिट बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष विभागाच्या आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

सकाळ वृत्तसेवा

अम्मान जॉर्डन : भारतीय बॉक्सर्सनी शुक्रवारचा दिवस गाजवला. पाच वेळा आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारा शिव थापा, सचिन व अमित कुमार या भारतीय खेळाडूंनी आशियाई एलिट बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष विभागाच्या आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

थापा हा ६३.५ किलो वजनी गटात सहभागी झाला. त्याच्यासमोर बायमबातसोग्त तुगुलदूर या मंगोलियाच्या खेळाडूचे आव्हान होते. दोन खेळाडूंमधील ही लढत अटीतटीची झाली, पण थापाने अनुभव व जलद हालचालींच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर ३-२ असा विजय साकारला.

अमित कुमार याला ६७ किलो वजनी गटात चीन तैपईच्या झेंग ह्युयांग याच्याशी दोन हात करावे लागले. या लढतीत भारतीय खेळाडूंचाच दबदबा दिसून आला. अमितकडे जबरदस्त तांत्रिक क्षमता असून प्रचंड आत्मविश्‍वासासह तो ही लढत खेळला. त्याने चीन तैपईच्या खेळाडूला ५-० असे सहज पराभूत केले. सचिन ७१ किलो वजनी गटात सहभागी झाला. त्याला थायलंडच्या पीरापत यीसुंगनोएन याचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीत सचिनला निराशेला सामोरे जावे लागले, पण पुढील दोन्ही फेरींमध्ये त्याने झोकात पुनरागमन केले आणि ५-० असा विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेची शक्यता

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT