Indian Captain Rohit Sharma May Be Top Of The Most ODI Runs In England esakal
क्रीडा

Rohit Sharma : रोहितच्या रडारवर विल्यमसन, पॉटिंगचे रेकॉर्ड

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यातील तीन वनडे (ODI Series) सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. आज (दि. 12) ओव्हवलवर मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) या सामन्यात वेस्ट इंडीजचे महान फलंदाज व्हीव रिचर्ड्स, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांचे रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

रोहित शर्माने यापूर्वीही इंग्लंडमध्ये वनडे सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये रोहितने पाच शतके ठोकून इंग्लंड हे फेव्हरेट स्कोरिंग नेशन असल्याचे सिद्ध केले होते. विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये झालेल्या 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सलामीवीर म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. आता रोहित शर्माला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात एक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी मैदानात उरतरेल. वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर पोहचू शकतो. तो सध्या या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 24 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 66.75 च्या सरासरीने 1335 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मापुढे आता व्हीव रिचर्ड्स (1345), रिकी पॉटिंग (1387) आणि केन विल्यमसन (1393) हे तीन फलंदाज आहेत. जर रोहित शर्माने आजच्या पहिल्या वनडे सामन्यात 58 धावा केल्या तर तो इंग्लंडमध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहचले. दरम्या, भारताने पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत इंग्लंडची अवस्था 5 बाद 26 धावा अशी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT